भाजप (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेअध्यक्षा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून,काँग्रेसच्या मराठी माणसावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. वाघ यांनी ट्विटरवर काँग्रेसला लक्ष्य करत स्पष्ट शब्दांत म्हटले की, बलात्कार करणारा आरोपी कोणत्याही जात, धर्म, भाषा, किंवा प्रांताशी संबंधित नसतो, मात्र काँग्रेसने मराठी माणसाबद्दल आपल्या मनातील आकस उघड केला आहे.
वाघ यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी टीव्ही डिबेटमध्ये केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. शर्मा यांनी “मराठी माणूस बदलापूरमध्ये बलात्कार केला तर, तुम्ही त्यालाही वाचवलं का?” असा सवाल उपस्थित करत मराठी माणसांवर टीका केली होती. यावर वाघ यांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला करत, “मराठी माणसाने बलात्कार केला असे म्हणताना काँग्रेसशी जीभ कशी जळली नाही? हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा,” असे ट्विट केले. भाजपा प्रवक्ते शहजाद पुनावाला पुनावालाही या प्रकरणात काँग्रेसवर निशाणा साधत, “अलोक शर्मा यांनी मराठी माणसांचा अपमान केला आहे आणि मी याची समस्त मराठी जनेकडून तीव्र आक्षेप घेतो” असं ते म्हणाले.
- साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी
- ‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा
- “व्यवहार केवळ हिंदूंसोबतच”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार
- तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’
- नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी