Wednesday, October 21, 2026

सोशल मीडियावर खोट्या नोटिसा, हिंदुत्ववादी हँडल्सना लक्ष्य करणारे रॅकेट

Share

सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठे बनावट रॅकेट सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर काही जिहादी घटकांकडून हिंदुत्ववादी विचार मांडणाऱ्या @Treeni सह अनेक प्रमुख हँडल्सना बनावट नोटिसा पाठवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या बनावट नोटिसांमध्ये अमृता फडणवीस यांच्या बनावट तक्रारीचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे.

कुणा-कुणाचा सहभाग असण्याचा संशय? 

संबंधित तक्रारदारांच्या मते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या हिंदुत्ववादी हँडल्सविरोधात अशा प्रकारच्या कारवाया करणार नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे षड्यंत्र असून, यात नगर व कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तसेच संबंधित यंत्रणांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने तातडीने तपास करावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी यामध्ये लक्ष घालून हिंदुत्ववादी विचारसरणीला बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या या खोट्या नोटिसांच्या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर घेतली जात आहे.

हे एखादे तांत्रिक षड्यंत्र आहे का किंवा सायबर गुन्हेगारांनी कुणाच्या बनावट आयडीचा वापर करून हा प्रकार चालवला आहे का, याचा सखोल सायबर तपास होणे आवश्यक असल्याचे म्हणले जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख