Sunday, October 20, 2024

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता मिळणार २९ सप्टेंबरपासून

Share

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.

व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

अन्य लेख

संबंधित लेख