Saturday, November 23, 2024

कोथरूड विधानसभा मतदारसंघ : अमोल बालवडकर पक्ष सोडणार?

Share

पुणे – पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ (Kothrud Assembly Constituency) हा भाजपाचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच धर्तीवर पूर्वी मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून ती जागा चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली. आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील झाले. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्थानिक नेते आपापलं ब्रॅंडिग करताना दिसत आहेत. अनेक इच्छूक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अमोल बालवडकर (Amol Balwadkar) हे नाव सुध्दा त्यातलं एक आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे. पण पक्षांतर्गत चढाओढ बघता ते वेगळी चुल आपलीशी करतील असे दिसते आहे.

कोथरूड मतदारसंघात लागलेल्या बॅनरचे बदललेलं डिझाइन्स आणि नुकताच झालेली त्यांची एक सभा यातून पक्षाचं नाव न घेता केलेल कॅंम्पेन यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणामध्ये कोण कुठे जातं हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख