Monday, October 28, 2024

हिंदू हितास १०० टक्के मतदान

Share

कात्रज, पुणे ः राजकीय स्वार्थासाठी जाणिवपूर्वक हिंदू विरोधी नरेटीव्ह पसरवला जात आहे. त्यामुळे आपला एकच नरेटीव्ह आहे. हिंदू हितास १०० टक्के मतदान आणि हिंदू हितास बाधक शक्तींना विरोध, अशा स्पष्ट शब्दांत अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आपले मत मांडले.

सेवा प्रबोधिनी आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जेष्ठ सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आपले विचार प्रगट केले. सेवा प्रबोधिनी द्वारे आयोजित ‘राष्ट्र हित सर्वोपरी’ या व्याख्यानात सोलापूरकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, “हिंदू विरोधी खोटा नरेटीव्ह सध्या पसरवला जात आहे. हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू विरोधी प्रचार जोराने होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमातून हिंदू विरोध विशिष्ट उद्देशाने होत आहे. मागील १० वर्षात देशात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उजळली आहे. भारत एक कणखर आणि शक्तीशाली देश म्हणून जगात आज उभा आहे. आज भारत अनेक जागतिक महासत्ताना आव्हान देत आहे. आणि त्यामुळेच भारत विरोधी प्रचार सुरु आहे.”

हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती टिकावी म्हणून अनेकांनी कष्ट घेतले ते आज सर्व वंदनीय आहेत. मात्र या खोड्या प्रचारामुळे हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत असल्याची खंत सोलापूरकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “जाती-पाती मध्ये हिंदू कशा प्रकारे गुंतून राहील याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सध्या होत आहे. लव्ह जिहाद सोबत लँड जिहाद होत आहे. वक्फ बोर्ड कायद्या मुळे भारतातील तिसरी सर्वात जास्त जमिनीची मालकी या वक्फ बोर्ड कडे आहे. या सोबत वोट जिहाद सुद्धा देशात वाढत आहे. वोट जिहाद द्वारे लोकशाही पद्धतीने भारताचे विद्रूपीकरण करणे सहज शक्य होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था संघटना हिंदू विरोधी कारवाया करता आर्थिक रसद पुरवत आहे. या सर्व राष्ट्र विरोधी घटकांना रोखण्यासाठी हिंदू हितास १००% मतदान झाले पाहिजे.” या वेळी सेवा प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय शिरोळकर उपस्थित होते. अभिजित चिंचोलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

अन्य लेख

संबंधित लेख