Friday, January 31, 2025

प्रवाशांना दिलासा! अटल सेतूवरील सवलतीचा टोल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कायम, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Share

मुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील (Atal Setu) सवलतीच्या दराने टोल आकारणी आणखी एक वर्षासाठी सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या टोल दराच्या ५०% सवलतीस मान्यता देण्यात आली होती. या निर्णयानुसार किमान २५० रुपये इतक्या दराने टोल आकारला जात आहे. एक वर्षानंतर या सवलतीचा आढावा घेण्याचा निर्णयही त्या वेळी झाला होता. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (MMRDA) उभारलेला सुमारे २२ किलोमीटर लांबीचा हा सेतू १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख