Thursday, October 30, 2025

मिरा रोड ते म्यानमार: जिहादी रॅकेट उघडकीस..

Share

एखाद्या भौगोलिक क्षेत्रात मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय होऊ लागली की आपसूक तेथील गुन्हेगारीचा आलेख वाढू लागतो. अगदी साखळी चोरांपासून अमली पदार्थांच्या व्यापारापासून ते मानवी तस्करी पर्यंत. मुंबई जवळील मीरा रोड हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मीरा रोडच्या लोकसंख्येत मुस्लिम समाजाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. मिरा रोड मधील गुन्हेगारीच्या बातम्या मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये सतत झळकत असतात.

मिरा-भायंदर पोलिसांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय मानव तस्करीचे एक गुंतागुंतीचे सायबर रॅकेट उघड केले आहे. या प्रकरणात बेरोजगार युवकांना परदेशात आकर्षक नोकरीचे आमिष दाखवून थायलंडमार्गे म्यानमारमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना “सायबर फ्रॉड” केंद्रांमध्ये जबरदस्तीने काम करायला लावले जात होते. पोलिसांच्या चौकशीत उघड झाले की पीडितांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन त्यांना छळ करण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबांकडून ६ ते १२.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळण्यात आली.

या जाळ्याचा मुख्य सूत्रधार चीनचा नागरिक ‘लिओ’ असून, भारतात ‘स्टीव्ह ऍना’ आणि मिरा रोडमधील अदनान शेख या व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. शेख हा फसव्या नोकरीच्या ऑफर देत लोकांना परदेशात पाठवण्याचे काम करत होता. थायलंडला पोहोचल्यावर पीडितांना सीमावर्ती भागातून म्यानमारमध्ये नेण्यात आले आणि एका बंदिस्त कॅम्पमध्ये ठेवून सायबर फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भारतीय असून तिला आरोपी “इम्रान उर्फ ​​इर्शाद हुसेन” आणि “अम्मार लकडावाला” यांनी दुबईत नोकरी देण्याचे आमिष दाखवून ऑगस्टमध्ये भारतातून दुबईला नेले. जिथे तिचा अमानवीय असा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या नराधमांनी तिचा पासपोर्ट जप्त हिसकावून घेतला आणि तिला कोंडून ठेवले. तिने प्रतिकार केला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि धमकावण्यात आले. तिच्या सुटकेसाठी भारतातील तिच्या कुटुंबाकडून ७,००० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ६ लाख रुपये) खंडणी वसूल करण्यात आली. तपासादरम्यान, हे रॅकेट म्यानमार आणि थायलंडमधील सायबर-गुलामगिरी (cyber-slavery) कारवायांशी जोडलेले असल्याचे उघड झाले.

एकंदरीत या बातमीतील एका महिलेची केलेली फसवणूक, क्रूरता, अमानवीय अत्याचार पहाता असा प्रश्न पडतो की ही विकृत मानसिकता कुठून येत असेल?

एखाद्या महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय ढकलणे यासारखे दुसरे पाप नाही. पण इथे पाप पुण्याच्या विचारापेक्षा… स्त्रीला इस्लाममध्ये असलेले दुय्यम स्थान… स्त्रीला निव्वळ भोग वस्तू मानण्याची धार्मिक शिकवण वरचढ ठरलेली दिसते… आणि त्यातही जर ती महिला काफीर असेल तर मग “गनिमतचाच माल”… हक्काने हवा तसा लुटून खा… आणि ही देखील इस्लामची धार्मिक शिकवणच.

विशेष म्हणजे त्या दुर्दैवी महिलेला ज्या दोन देशात हे नराधम घेऊन गेले ते दोन्ही देश देखील इस्लामिक देशच आहेत –  म्हणजे सोने पे सुहागा.

दुबई किंवा ओमानमध्ये आपल्यावर शारीरिक अत्याचार झाल्याची तक्रार तिने केली असती तर, तिला इस्लाममधील शरिया कायद्यानुसार चार साक्षीदार आणावे लागले असते. बलात्कार झालेल्या महिलेला चार साक्षीदार आणणे ब्रह्मदेवाला तरी शक्य आहे का?… हे साक्षीदार ती निश्चितपणे आणू शकली नसती… आणि मग व्यभिचाराच्या आरोपाखाली त्या दुर्दैवी पिडीतेलाच फटक्यांची किंवा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा मिळाली असती…

कदाचित हे इस्लामिक शरीरा कायदे माहीत असल्यामुळे ओमान मधून सुटका करून घेतली तरीही त्या दुर्दैवी पिडीतेने ओमानमध्ये कोणतीही तक्रार दाखल केली नाही. सुटका करून घेतल्यानंतर ती ओमानच्या पोलिसांकडे गेली नाही तर तेथील भारतीय वकिलातीशी तिने संपर्क साधला, आणि ती भारतात आली. हिंदू बहुल भारतात आल्यामुळे ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू शकली. पोलिसांनी या षडयंत्राची चौकशी केली आरोपींना अटक केली व आता तिला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हिंदू बहुल भारताच्या संविधानाचे.. फौजदारी कायद्यांचे हे विलक्षण वेगळेपण आहे !

-हिमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख