Friday, November 22, 2024

दर्गा, पीर, वक्फ बोर्डाचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसला बहुजन संत गोरोबा काका कुंभार यांची आठवण कधी झालीच नाही..

Share

संत नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन समकालीन असणारे संत गोरोबा काका यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी झाला. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करून प्रपंच सांभाळला. संसार सांभाळून त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला. 

संत गोरोबा काका यांना संत गोरा कुंभार या नावाने ओळखले जाते. त्यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. संत गोरोबाकाका हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.

संत परंपरेमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, साधुसंतांना ते परम वंदनीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना ‘काका’ ही उपाधी बहाल केली होती.

प्रत्यक्ष पांडुरंग, रुक्मिणी आणि गरुड यांनी संत गोरोबा काकांच्या घरी कुंभार काम केले.  गरुड माती वाहत असे विठ्ठल चिखल तुडवी तर रुक्मिणी पाणी भरी. भगवंत विठ्ठलाने चाकावर नाना प्रकारची गाडगी मडके तयार करून विकली.

महान संत गोरोबा काका आणि त्यांच्या कार्याकडे मुस्लिम धार्जिने शरद पवार, काँग्रेस आणि फसवे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.मात्र काळजात संतांविषयी पराकोटीचा आदर बाळगणाऱ्या महायुती सरकारने संत गोरोबा काकांच्या  कार्याची दखल घेतली. संत गोरोबा काकांच्या कार्य कर्तुत्वाला न्याय मिळावा म्हणून महायुती सरकारने खारीचा वाटा उचलला.

संत गोरोबा काकांच्या आशीर्वादाने जनतेच्या सेवेसाठी मिळालेला कालावधी सत्कारणी लावून महायुती सरकार  संत गोरोबा काकांच्या पायाशी नतमस्तक झाली. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब या संस्थेला संतश्रेष्ठ गोरोबाकाकांचे नाव दिले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जि. धाराशिव 
आता झाली…

संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब 

आमचा वसा  संतांच्या विचाराचा 
आमचा वारसा राष्ट्रहिताच्या आचाराचा..

कारण आमची भूमी आहे 
एक महाराष्ट्र…. श्रेष्ठ महाराष्ट्र…

बहुजन संतांच्या विचाराचा वारसा जपणाऱ्या महायुतीच्या पाठीशी बहुजन समाजही खंबीरपणे उभा राहणार…..

अन्य लेख

संबंधित लेख