Friday, September 13, 2024

बारावीचा निकाल “या” दिवशी जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा; इथे पाहता येणार निकाल

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेच्या निकालाची (HSC Result Date) तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल “या” दिवशी जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा; इथे पाहता येणार निकाल उद्या मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती.  बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. 

इथे पहा निकाल 

१. mahresult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. http://results.targetpublications.org

अन्य लेख

संबंधित लेख