Wednesday, November 13, 2024

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक!

Share

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! असल्याची टीका भाजपाकडून होत आहे. महाविकास आघाडीकडे विचार नाही…त्यामुळे पक्षाअंतर्गत वाद होत आहे. अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

https://x.com/i/status/1847933226914025977

महाराष्ट्राचा विकास, गरीबांचे कल्याण असा कोणताही विचार महाविकास आघाडी करत नसून केवळ भाजपाचा द्वेष करणे एवढेच काम ते करतात असेही ते म्हणाले.  
एरवी इव्हीएम वरुन बोलणारे माहविकासआघाडीचे नेते आता मतदार यादीवरुन टीका करताना दिसताहेत असेही ते म्हणाले.

तसेच, महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक कशी आहे याबद्दलचा संदेश भाजपाने आपल्या समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे.   

सिगारेट आरोग्यासाठी तर महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक!

सिगारेट माणसाला आतून पोखरते त्याप्रमाणेच महाविकास आघाडी महाराष्ट्राला आतून पोखरत आहे. अशा विनाशकारी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवायलाच हवे. असे या संदेशात म्हटले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख