Friday, November 13, 2026

महाराष्ट्राची कन्या नेहा चव्हाणचा सन्मान, राष्ट्रपतींच्या हस्ते विविध क्रीडा पुरस्कार प्रदान

Share

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५’ प्रदान केले. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी आणि त्याबद्दल सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.  पाच प्रशिक्षकांना त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. परवीर सिंग, छोटे लाल यादव आणि नेहा नंदकुमार चव्हाण यांना ‘नियमित श्रेणी’मध्ये, तर धर्मेंद्र सिंग यादव आणि वीरेंद्र कुमार यांना ‘जीवनगौरव श्रेणी’मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला.

https://www.instagram.com/reel/DfrStMVuCgF/?utm_source=ig_web_copy_link&exln=NTc4MTIwNjQ2YQ==


क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुणे येथील ‘आर्मी पॅरालिम्पिक नोड’ला ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ देण्यात आला. तसेच, बलजीत कौर आणि रिमो साहा यांच्यासह एकूण चार व्यक्तींना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यासोबतच, राष्ट्रपतींनी ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४’ देखील प्रदान केले.

२०२५ या वर्षासाठी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण १७ खेळाडूंची ‘अर्जुन पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली होती.

https://x.com/rashtrapatibhvn/status/2121155093596979371


यामध्ये खेळाडू तेजस्विन शंकर आणि प्रियांका गोस्वामी, बुद्धिबळपटू दिव्या जितेंद्र देशमुख, हॉकीपटू राजकुमार पाल आणि कबड्डीपटू पूजा यांचा समावेश आहे, ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय फुटबॉलपटू इसाया अरुमायनायगम यांना ‘अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)’ देऊन गौरविण्यात आले.

क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुणे येथील ‘आर्मी पॅरालिम्पिक नोड’ला ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ देण्यात आला. तसेच, बलजीत कौर आणि रिमो साहा यांच्यासह एकूण चार व्यक्तींना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख