काश्मीर खोऱ्यात जेव्हा दहशतवाद्यांकडून भारतीय नागरिक, हिंदू भाविक किंवा पर्यटकांवर भ्याड हल्ला केला गेला, तेव्हा संपूर्ण देश सुन्न झाला होता. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि संपूर्ण देश जेव्हा यांना श्रद्धांजली वाहात होता, तेव्हा याच देशात राहून किंवा परदेशात बसून या दहशतवादी हल्ल्यांचे उघडपणे समर्थन करणारे काही विकृत मानसिकतेचे लोकही समाजात वावरत होते. सोशल मीडियाच्या पडद्यामागे लपून दहशतवादाचे उदात्तीकरण करणाऱ्या अशाच एका ‘डिजिटल स्लीपर सेल’चा बुरखा आता कायदेशीर कारवाईमुळे फाटला आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे सोशल मीडियावर उघडपणे समर्थन करणाऱ्या केरळच्या मोहम्मद सनूफ याच्यावर पोलिसांनी UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात कोची (केरळ) येथील रहिवासी असलेले एन. रामचंद्रन यांचा मृत्यू झाला होता. या दुःखातून सावरत असतानाच, त्यांच्या मुलीने आपल्या वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ पोस्ट केला होता. संपूर्ण देश या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत असताना, मोहम्मद सनूफ (वय २६, रा. मल्लपुरम, केरळ) या जिहादी मानसिकतेच्या तरुणाने त्या व्हिडिओखाली अत्यंत आक्षेपार्ह, क्रूर आणि दहशतवादी हल्ल्याचे थेट समर्थन करणारी कमेंट केली.
एका नागरिकाच्या मुलीच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या संतापजनक कृत्यानंतर, भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. इडुक्की जिल्ह्यातील मुट्टम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सनूफविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी केली होती.
विमानतळावरच मुसक्या आवळल्या: ‘UAPA’ अंतर्गत कठोर कारवाई
एअरपोर्टवरच अटक: गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मोहम्मद सनूफ सौदी अरेबियामध्ये होता. त्याला वाटले की परदेशात बसून भारताच्या विरोधात बरळले तरी आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही. मात्र, तो भारतात परतणार असल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. तो सौदी अरेबियाहून केरळच्या कारीपूर (कोझिकोड) विमानतळावर उतरताच सुरक्षा दलांनी त्याला ताब्यात घेतले.
केवळ एक कमेंट की देशविरोधी षड्यंत्र?- सुरुवातीला सनूफवर धार्मिक सलोखा बिघडवणे आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. परंतु, मुट्टम पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्याचा मोबाईल जप्त करून तांत्रिक तपासणी केली असता, प्राथमिक तपासात पोलिसांच्या हाती त्याचे दहशतवादी विचारसरणीशी आणि देशविरोधी मानसिकतेशी जोडलेले धक्कादायक पुरावे लागले. एका नागरिकाच्या हत्येचा उत्सव साजरा करणे हा केवळ वैयक्तिक आक्षेप नसून, देशाच्या सुरक्षेला आणि ऐक्याला थेट आव्हान असल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी त्याच्यावर थेट ‘अँटी-टेरर’ म्हणजेच UAPA कायदा लावला.
आरोपी मोहम्मद सनूफ सध्या न्यायिक कोठडीत असून, या गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्याचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे पाहता हा तपास ‘अँटी-टेररिझम स्क्वॉड’ (ATS) किंवा ‘क्राइम ब्रँच’कडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि हिंदू अस्मितेला आव्हान देणाऱ्या अशा कोणत्याही देशविघातक प्रवृत्तीला भारतात अजिबात स्थान मिळता कामा नये.