Wednesday, November 27, 2024

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Share

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जयदीप आपटे आणि  बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज दुपारी मालवणच्या न्यायालयात हजर करण्यात आल होतं. आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.

 राजकोट किल्ला इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला  घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम. आर. देवकाते यांनी सुनावणी केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख