Sunday, October 13, 2024

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न

Share

राणीसावरगाव : श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज (हिमाचल प्रदेश,शिमला) यांच्या चातुर्मासिय समाप्ती निमित्त राणीसावरगाव (Ranisawargaon) तालुका गंगाखेड येथे धर्मसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गावाचे ग्रामदैवत असलेले साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाणारे रेणुका देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात वृक्षरोपण केले.

धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणि मुखावर आनंद ठेवला पाहिजे. तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करत रहावे. कोणतेही निमित्त असले, तरी राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी लोकांना सतत जागृत केले पाहिजे. आपण आपल्या कोणत्याही कार्यात आध्यात्मिकता ठेवावी. त्यामुळे आपल्याला निश्चित यश मिळेल, असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

यावेळी, गावातील निवृत्ती भिमनपल्लेवर, नवीनप्रसाद दुबे, मारोती कोरे, संतोष गाडे, संतराम सलमोटे, प्रा.शिवाजी जाधव, संदीप कोतळवर, विशाल पुराणिक, सतीश स्वामी, माधव कोटपल्लेवर, गजानन उपरे हे उपस्थित होते. तर, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बजरंग दल चे अंतराम मुंढे, संजय (लाला) अनावडे, दयानंद कुदमुळे, संदीप भिमणपल्लेवर यांनी प्रयत्न केले.

अन्य लेख

संबंधित लेख