उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. एका प्रतिष्ठित आणि सधन हिंदू औषध व्यावसायिकाच्या सुशिक्षित मुलाने इस्लाम धर्म स्वीकारून चांदणी कुरेशी नावाच्या तरुणीशी विवाह केल्याची घटना समोर आली. हे प्रकरण केवळ वैयक्तिक निवडीचे किंवा प्रेमाचे नसून, त्यामागे असणारा छुपा अजेंडा, पाकिस्तानी कट्टरपंथी विचारवंतांचे जाळे आणि सक्षम हिंदू तरुणांना लक्ष्य करणारी पद्धतशीर यंत्रणा आता उघड झाली आहे. या संपूर्ण घटनेने हिंदू समाजासमोरील सांस्कृतिक आणि धार्मिक आव्हानांना पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
नियोजित जाळे आणि पाकिस्तानी कट्टरपंथीयांचा प्रभाव
पॉलीग्राफ चाचणी आणि पोलीस तपासातून समोर आलेल्या तथ्यांनी या प्रकरणातील धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. आयुष मलिक हा तरुण गेल्या काही काळापासून इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानी इस्लामिक कट्टरपंथीयांची भाषणे ऐकत होता. त्यातही इसरार अहमद या व्यक्तीचे तथाकथित वैज्ञानिक इस्लाम मंडणारे यूट्यूब व्हिडिओस पाहत होता. हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या आणि सुशिक्षित असलेल्या या तरुणाचे ब्रेनवॉश करण्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत हुशारीने वापर करण्यात आला. सनातन धर्माविषयी संभ्रम निर्माण करणे आणि इस्लामिक विचारसरणी लादणे, ही या नियोजित आंतरराष्ट्रीय जाळ्याची कार्यपद्धती राहिली आहे. तपास यंत्रणांच्या मते, हे केवळ एका तरुणाचे वैयक्तिक मतपरिवर्तन नसून, हिंदू समाजातील सक्षम तरुणांना लक्ष्य करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे हे एक मोठे कारस्थान आहे.
हिंदू कुटुंबाची व्यथा
आयुषच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, आयुषला जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्याचे धर्मांतर करण्यासाठी एका मोठ्या टोळीने काम केले आहे. त्याला धमकावून, आमिषे दाखवून किंवा तीव्र मानसिक दबाव आणून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेले आहे. तसेच, कॅमरा समोर त्याला दबावाखाली आणून ‘स्वेच्छेने धर्म बदलला’, असे सांगायला भाग पाडले आहे. ज्यामुळे, पॉलिग्राफिक चाचणी सुद्धा करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणी कायदेशीर दाद मागितली असून प्रशासनाने या सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतराच्या विरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे तथाकथित सेक्युलर घटक याला ‘वैयक्तिक स्वातंत्र्य’ आणि ‘दोन सज्ञान व्यक्तींचा अधिकार’ असे म्हणून मूळ गुन्ह्यावरून आणि कटावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जागृत हिंदू, सुरक्षित भारत
शामली येथील आयुष मलिकचे प्रकरण हे संपूर्ण हिंदू समाजासाठी एक ‘वेक-अप कॉल’ आहे. हे केवळ एक साधे धर्मांतर नसून भारताची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलण्याचा आणि हिंदू समाजाला अंतर्गत पातळीवर कमकुवत करण्याचा एक सुनियोजित ‘सांस्कृतिक आणि धार्मिक जिहाद’ आहे. शामलीसारख्या संवेदनशील भागात अशा घटना घडणे हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि सामाजिक सलोख्याला आव्हान देणारे आहे.
जेव्हा कुटुंबांमध्ये धार्मिक संवाद आणि संस्कारांची कमतरता असते किंवा तरुण पिढी सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडते, तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात. कुटुंब व्यवस्था मजबूत करणे आणि तरुणांना आपल्या गौरवशाली धर्माचे व संस्कृतीचे शिक्षण देणे हाच यावरील एकमेव शाश्वत उपाय आहे.
आपल्या घरात पाल्यांच्या वर्तनात काय बदल होत आहेत, ते इंटरनेटवर कोणत्या प्रकारची सामग्री पाहत आहेत, याकडे पालकांनी डोळसपणे पाहिले पाहिजे. ‘संघटित, सुशिक्षित आणि जागृत हिंदू समाज’ हेच अशा देशविरोधी आणि धर्मविरोधी शक्तींना चोख उत्तर ठरू शकते. आपल्या तरुणांचे रक्षण करणे आणि त्यांना धर्मविन्मुख होऊ न देणे, हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. जेव्हा समाज स्वतः स्वधर्म आणि राष्ट्राप्रती जागृत होईल, तेव्हाच असे छुप्या अजेंड्यांचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले जातील.