Monday, September 14, 2026

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य – एकनाथ शिंदे

Share

चाकण शहरातील रस्त्यांच्या अवस्थेमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला पडणारे खड्डे बुजविण्याला देखील प्राधान्य द्यावे, आवश्यक असेल तेथे नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपूल उभारणीचेही नियोजन करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चाकण शहराचा विकास आराखडा तातडीने मंजूर करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्री-कास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांनी एकत्र येऊन तात्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रांसाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यासह चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

अन्य लेख

संबंधित लेख