Tuesday, September 22, 2026

भारताच्या लेकींची सुवर्णपदकावर मोहोर…T-20 क्रिकेट टीमचे अभिनंदन

Share

भारताच्या महिलाशक्तीचे वर्चस्व… आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक …T-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय
आयची-नागोया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी गोल्डन कामगिरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताने घेतला. सलामीला आलेल्या शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 99 धावांची भागीदारी केली.

https://twitter.com/KirenRijiju/status/2102308473065353654/video/1

महिला क्रिकेट संघने अंतिम सामन्यात श्रीलंका महिला क्रिकेट संघचा तब्बल 147 धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 216 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव अवघ्या 69 धावांत आटोपला.

स्मृती मानधना 16.5 षटकांत 163 धावांवर बाद झाली. त्यामुळे भारताला 200 धावांचा टप्पा गाठणे कठीण वाटत होते. मात्र, रिचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत सामन्याचे चित्रच बदलले. धावपट्टीवर जोरदार खेळ करत रिचाने तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश केला. अवघ्या 22 चेंडूंत नाबाद 49 धावा केल्या.

217 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीपासूनच मोठे धक्के बसले. कर्णधार चमारी अटापट्टू आणि इमेशा दुलानी यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, पहिल्या विकेटसाठी त्यांना केवळ 18 धावाच करता आल्या. फलंदाजीत 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्यानंतर शेफाली वर्माने गोलंदाजीतही कमाल केली.

अन्य लेख

संबंधित लेख