Saturday, November 14, 2026

दिवाळीत पुणेकरांची मेट्रोला सात दिवसांत १२ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Share

दिवाळीच्या सुट्यांमध्ये पुणेकरांनी सार्वजनिक वाहतुकीला विशेष पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. या काळात पुणे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ५ ते ११ नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत तब्बल १२ लाख १३ हजार ८६८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.

या वाढत्या प्रवासी संख्येमुळे पुणे मेट्रोच्या उत्पन्नातही भर पडली आहे. दिवाळीच्या सुट्यांमधील या सात दिवसांत मेट्रोला तब्बल १.८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. सणासुदीच्या काळात खरेदी, पर्यटन आणि नातेवाईकांच्या भेटींसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांनी मेट्रोला पसंती दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. पुणे मेट्रो ही शहरातील नागरिकांसाठी वेगवान, सोयीस्कर आणि सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. दिवाळीच्या सुट्यांमधील प्रवासी संख्येने मेट्रोच्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

दिवाळीच्या सुट्यांमध्ये पुणेकरांनी सार्वजनिक वाहतुकीला विशेष पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. या काळात पुणे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ५ ते ११ नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत तब्बल १२ लाख १३ हजार ८६८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.

अन्य लेख

संबंधित लेख