Saturday, November 14, 2026

‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाला भेट देऊन महाराष्ट्राचा हा जाज्वल्य इतिहास समजून घ्यावा-  मंत्री ॲड. आशिष शेलार

Share

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे, सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून, सर्व नियम आणि प्रक्रियांचे पालन करत महाराष्ट्रात परत आणणे हे आमचे कर्तव्यच होते. शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाला भेट देऊन महाराष्ट्राचा हा जाज्वल्य इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणला

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, शस्त्रे ही केवळ पराक्रमाची प्रतीके नसून ती धैर्य, अभियांत्रिकी कौशल्य, धातुशास्त्र आणि अचूक नियोजनाचे दर्शन घडवतात. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हे नियोजनबद्ध विजयाचे प्रतीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय नियम, प्रथा व संकेतांचे पालन करून प्रदीर्घ वाटाघाटी आणि अथक प्रयत्नांतून हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणला आहे.

सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीबाबतचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि भारतीय दूतावासाच्या आवश्यक परवानग्या तातडीने मिळविण्यात आल्या. योग्य मध्यस्थी आणि समन्वयातून ही तलवार महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मालकीची म्हणून सन्मानाने परत आणण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याच्या प्रक्रियेचाही उल्लेख करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून सदस्य राष्ट्रांशी संवाद साधून भारताची बाजू मांडण्यात आली. परिणामी, हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. आज भारतीय नौदलाच्या ध्वजावर आणि पोशाखावरही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा सन्मानाने झळकत आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, रघुजीराजे भोसले यांची तलवार, सरसेनापती प्रतापराव गुजर यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल, सरदार रास्ते यांचा दांडपट्टा यांसह शिवकालीन आणि समकालीन अनेक ऐतिहासिक शस्त्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन पुढील सहा महिने सर्वांसाठी खुले राहणार

अन्य लेख

संबंधित लेख