Tuesday, September 1, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत संबोधन

Share

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे आज २६ वी शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषद सुरू आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हस्तांदोलन केले आणि विविध मुद्यांवर संवाद साधला.

दरम्यान, या परिषदेत सहभागी होण्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान द्विपक्षीय स्तरावर चर्चा झाली.

या वर्षीच्या SCO शिखर परिषदेची संकल्पना ‘SCO ची २५ वर्षे: शाश्वत शांतता, विकास आणि समृद्धीच्या दिशेने एकत्रित वाटचाल’ अशी आहे. SCO मध्ये भारत, चीन आणि रशियासह १० सदस्य देशांचा समावेश आहे. भारत २०१७ पासून SCO चा पूर्ण सदस्य आहे.

भारत-रशिया यांच्यातील ‘विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी’च्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली. गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रांत झालेली लक्षणीय प्रगती पाहून दोनही नेत्यांनी आनंद होत आहे.

ऊर्जा, नवोन्मेष (इनोव्हेशन), अंतराळ, खते आणि जनसंपर्क (लोकांमधील परस्पर संबंध) हे भारत-रशिया मैत्रीचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. असा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख