Saturday, September 12, 2026

पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये – एकनाथ शिंदे

Share

पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये भरवण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्यावतीने शिंदे यांना ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली माती, भाषा आणि संस्कृती विसरत नाही. जगभरातील मराठी भाषिकांना अधिक भक्कमपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल असं ते म्हणाले.

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो आपली माती, भाषा आणि संस्कृती कधीही विसरत नाही. नुकताच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा हा डंका जगभरात गाजवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी माणसांना मजबूतपणे जोडण्यासाठी  लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाईल, असे शिंदे म्हणाले.यावेळी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.  गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई त्याचप्रमाणे इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे.  त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी राज्य सरकार आणि एकनाथ शिंदे म्हणून मी खंबीरपणे उभा आहे,  असा विश्वास त्यांनी दिला.

अन्य लेख

संबंधित लेख