स्थानिक नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा अधिक सोयीस्करपणे आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने चार जिल्ह्यातील महसूल विभागात ‘अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत देण्यात आली आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, स्थानिक नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा अधिक सोयीस्करपणे आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच, यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरील कामाचा ताण कमी होण्यास आणि प्रशासकीय प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होईल.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा जवळच्या ठिकाणी सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने दापोली येथे ‘अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा जवळच्या ठिकाणी सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बारामती येथे ‘अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय’ स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा जवळच्या ठिकाणी सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पंढरपूर येथे ‘अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय’ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा सहज आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी, सरकारने ‘अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.