Saturday, September 7, 2024

दहावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर जाणून घ्या कुठे व कसा पहाल निकाल?

Share

मार्च 2024 मध्ये परीक्षा दिलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. यानुसार 27 मे 2024 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येईल.

विद्यार्थी हा निकाल दुपारी एक वाजल्यापासून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन बघू शकतील.
गेल्या आठवड्यात बोर्डाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतरहून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. निकालाची तारीख अखेर मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

27 मे ला एक वाजता विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करणार आहेत विद्यार्थी त्यांचा निकाल खालील संकेतस्थळावर बघू शकतील:

1)https://resultstargetpublicationorg

2)https://results.digilocker gov.in

3) https://sseresultmahahsscboard.in

4)http://sscresult.mkcl.org

5)https://mahresult.nic.in

गुणपडताळणी व छायाप्रती साठी प्रक्रिया 28 मे ते 11 जून पासून अर्ज व शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी फॉलो करा आमच्या …….पेजला..

अन्य लेख

संबंधित लेख