Wednesday, January 28, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Share

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी एका अधिकृत संदेशाद्वारे अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“दीर्घ आणि प्रभावी सार्वजनिक जीवन”
दत्तात्रेय होसबाले यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी यांचे आज अचानक विमान अपघातात निधन होणे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांचे सार्वजनिक जीवन अत्यंत प्रदीर्घ आणि प्रभावी राहिले आहे.”

संघाकडून दुःख व्यक्त
संघाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ॐ शांती.”

अजित पवार यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एका अनुभवी आणि कार्यक्षम नेत्याने जगाचा निरोप घेतल्याची भावना संघ परिवाराकडून व्यक्त करण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख