Saturday, May 2, 2026

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

Share

गंगाखेड (परभणी) : हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कृती, एकता आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी सकल हिंदू समाज, कोद्री उपखंडाच्या वतीने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी भव्य ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कोद्री उपखंडातील हनुमान मंदिर परिसरात हा प्रेरणादायी सोहळा रंगणार आहे.

संमेलनाची सुरुवात बुधवारी सकाळी ९:०० वाजता हनुमान मंदिरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होईल. भारतमातेची प्रतिमा, भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजरात आणि हिंदू धर्माच्या जयघोषात ही शोभायात्रा संपूर्ण कोद्री परिसर भक्तिमय करेल. त्यानंतर सकाळी १०:०० वाजता मुख्य प्रबोधनपर कार्यक्रमाला सुरुवात होईल.

या संमेलनास श्री. ह.भ.प. बंडोपंत महाराज मुंडे यांचा ‘संत उपदेश’ लाभणार आहे. तसेच देवगिरी प्रांताचे संपर्क प्रमुख इंद्रजित बैस हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून हिंदू धर्म, संस्कृती आणि राष्ट्रसेवेवर मार्गदर्शन करतील.

“हिंदू धर्म ही आपल्या संस्कृतीची आणि राष्ट्रभक्तीची ओळख आहे. या महान परंपरेचे जतन करण्यासाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कोद्री उपखंडातील सर्व हिंदू बांधव, माता-भगिनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती ‘सकल हिंदू समाज’ कोद्री उपखंडाच्या वतीने करण्यात आली आहे.

वेळ आणि स्थळ

दिनांक: १८ मार्च २०२६ (बुधवार)

वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी १२:००

स्थळ: हनुमान मंदिर, कोद्री उपखंड, ता. गंगाखेड.

अन्य लेख

संबंधित लेख