Friday, March 27, 2026

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

Share

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. “नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली”.

बातमीत पुढे म्हटले आहे…

एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले. एका दुचाकी गॅरेजला लागलेल्या भीषण आगीच्या ज्वाळांमधून मुस्लिम बांधवांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता भगवान शंकराची मूर्ती सुरक्षित बाहेर काढली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या तरुणांच्या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिंदू-मुस्लीम एकीच्या दर्शनाने नेटिझन्सही सुखावले आहेत.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावर संतोष काळे यांचे पूजा ऑटो पार्ट नावाचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास या गॅरेजला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे गॅरेजमधील ऑईल, टायर आणि इतर महागडे सुटे भाग जळून खाक होऊ लागले.

महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढली

आगीचे लोट लांबूनच दिसत होते. पहाटेची नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडलेल्या मुस्लिम तरुणांनी आगीचे लोट पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हे तरुण क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने दुकानाचे शटर उचकटले आणि आत अडकलेले साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, आगीच्या विळख्यात असलेल्या भगवान शंकराची मूर्ती या तरुणांनी मोठ्या श्रद्धेने आणि सुरक्षितपणे बाहेर काढली.

अन् मोठा अनर्थ टळला….

हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रयत्नांमुळे आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत संतोष काळे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असले, तरी या मुस्लिम तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. संकटाच्या वेळी धावून येणारा हाच खरा माणुसकीचा धर्म, अशी भावना परिसरात व्यक्त केली जात आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे. गॅरेजमधील सामान वाचवताना महादेवाची मूर्ती अनायसे हाती लागली. केवळ महादेवाची मूर्ती वाचवण्यासाठी कोणीही मुसलमान त्या आगीत शिरले नव्हते. रामनवमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेच्या बातमीतील “महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढली” हा परिच्छेद आणि उल्लेख भयंकर खटकणारा तसेच महाराष्ट्र टाइम्स नेमकं काय लपवू पहातंय? असा प्रश्न पडणारा आहे.

गॅरेजचा मालक हिंदू असल्यामुळे मुसलमानांनी “महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढली” या शीर्षकाला एक आगळीवेगळीच भाईचारा, सर्वधर्मसमभाव, गंगाजमुना तहजीब, सेक्युलॅरिझम या सगळ्यांची एक लकाकी चढवली गेली आहे.

छत्रपती संभाजी नगरच्या सकल हिंदू समाजाला या एका घटनेमुळे स्थानिक मुसलमानांनी कायमचे उपकृत केल्याचा दर्प बातमीत जाणवतो.

https://share.google/o4wavrBInKAxMb4dx

तेव्हा कुठे गेली होती तुमची श्रद्धा?

१) मालवणी, मालाड, मुंबई

काल रामनवमीच्याच दिवशी, मुंबईतील मालाड या उपनगरातील लक्षणीय संख्येने मुसलमान वस्तीत रामनवमी निमित्त मालवणीचा सकल हिंदू समाज भगवे झेंडे आणि पताका लावून सुशोभिकरण करत असताना एका मुस्लिम महिलने अचानक रामभक्तांवर हात उचलला. आधी एका मुस्लिम महिलेला पुढे केल्यावर मग नेहमीप्रमाणे पूर्वनियोजित षडयंत्रानुसार तिथे धर्मांध मुसलमानांचा मोठा जमाव जमला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पण एक प्रश्न उरतोच.

छत्रपती संभाजी नगरच्या मुसलमानांनी जर महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढली असेल तर ती श्रद्धा निश्चितच कुराण वाचूनच त्यांच्यात आली असणार. आणि ती कौतुकाची बाब देखील आहे. पण मग रस्त्यावर लावलेले भगवे झेंडे आणि पताका सहन न होणाऱ्या त्या मालवणीच्या मुस्लिम महिलेने व तिच्या बुरख्याआड जमलेल्या धर्मांध मुसलमानांनी वेगळे कुराण वाचले आहे का? बहुदा उत्तर होय असेच असावे.

कारण मालवणीच्या त्या मुस्लिम महिलेने व तिच्या बुरख्याआड जमलेल्या धर्मांध मुसलमानांनी जर छत्रपती संभाजी नगरच्या महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढणाऱ्या मुसलमानांनी वाचलेले कुराणच वाचले असते तर त्यांनी निव्वळ भगवे झेंडे व पताकांवरून एवढा तमाशा केला नसता.

४ दिवस आधी देशभरात आणि पर्यायाने मालवणीत रमजान ईद शांततेत पार पडली. याबद्दल हिंदू समाजाचे कौतुक करणारे दोन शब्द देखील महाराष्ट्र टाइम्सने लिहिले नाहीत. ठीक आहे. भाईचारा खऱ्या अर्थाने सकल हिंदू समाजच एकतर्फी निभावत असतो. पण रामनवमीला मात्र मुसलमानांकडून हैदोस घालण्यात आला याबाबत सुद्धा महाराष्ट्र टाइम्सने बातमी देऊ नये?

महाराष्ट्र टाइम्सने छत्रपती संभाजी नगरची बातमी देताना मालवणीची बातमी मात्र शिताफीने गाळली आहे. का…? या बातमीला न्यूज व्हॅल्यू नव्हती की गंगाजमुना तहजीब सरस्वतीत लुप्त झाली असती?

https://hindi.opindia.com/news-updates/mumbai-malvani-ram-bhakts-carrying-saffron-flags-pennants-during-ram-navami-attacked-islamic-fundamentalists

तेव्हा कुठे गेली होती तुमची श्रद्धा?…

२) औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर…

AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) या पक्षाने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर करण्याला सर्वाधिक विरोध दर्शवला होता. छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ दिवस साखळी उपोषण केले होते. नामांतराच्या विरोधात शहरात मोर्चे काढण्यात आले आणि उपोषणे करण्यात आली. काही आंदोलनांमध्ये औरंगजेबाचे फोटो झळकवल्यामुळे वादही निर्माण झाला होता.

मग प्रश्न असा पडतो, एकाच छत्रपती संभाजीनगरात राहणारे काही मुसलमान महादेवाची मूर्ती आगीतून मोठ्या श्रद्धेने बाहेर आणतात. त्याचवेळी त्याच छत्रपती संभाजी नगरात राहणारे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांचे समर्थक महादेवाचा प्रचंड द्वेष करणाऱ्या, फतवा काढून काशी विश्वनाथाचे म्हणजेच महादेवाचे मंदिर पाडून त्याच्यावर “ज्ञानवापी मशीद” बांधणाऱ्या, क्रूरकर्मा जिहादी मुघल शासक औरंगजेब याच्या नावावरून पडलेल्या “औरंगाबाद” नावाचे समर्थन करतात. त्याचे पोस्टर झळकावून औरंगजेबाबद्दल प्रेम दाखवतात आणि महादेवाचे उपासक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला मात्र विरोध करतात. औरंगाबाद हा त्यांना शहराचा ऐतिहासिक वारसा आणि ओळख वाटते. नामांतराचे हे प्रकरण अगदी न्यायालयात देण्यापर्यंत देखील मुस्लिम समाजाकडून नामांतराला विरोध केला गेला.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांना शहरातील विकास कामांसाठी “जे लोक किंवा लोकप्रतिनिधी पत्रावर किंवा लेटरहेडवर शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ असे लिहिणार नाहीत, त्यांच्या प्रस्तावांवर विचार केला जाणार नाहीत. काही प्रकरणांमध्ये लेटरहेडवर ‘औरंगाबाद’ खोडून हाताने ‘संभाजीनगर’ लिहिण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी असे बदल नाकारून छत्रपती संभाजीनगर असे “छापलेल्या” नवीन लेटरहेडची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी नगरातील या औरंगजेब प्रेमी मानसिकतेच्या मुसलमानांनी आणि महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढणाऱ्या बहुदा या दोघांची कुराणे खात्रीने वेगवेगळी असावीत. अन्यथा एकाच शहरातील मुस्लिम धर्मियांमध्ये एवढा वैचारिक विरोधाभास असणे शक्यच नाही.

तेव्हा कुठे गेली होती तुमची श्रद्धा?…

३) त्र्यंबकेश्वर, नाशिक

 १३ मे २०२३ संदलच्या मिरवणुकीदरम्यान काही मुस्लिम तरुण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वारावर आले. त्यांनी मंदिराच्या पायऱ्यांवर उभे राहून देवाला धूप दाखवण्याचा तसेच आकिल युसूफ सैयद, सलमान अकिल सैयद, मतीन राजू सैयद और सालिम बख्शू सैयद या ४ मुसलमानांनी त्र्यंबकेश्वरावर चादर चढवण्याचा देखील प्रयत्न केला. मंदिर प्रशासनानुसार, मंदिरात केवळ हिंदूंना प्रवेशाची परवानगी असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले.

स्थानिक मुस्लिम समुदायाने असा दावा केला की, ही १०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. मिरवणुकीवेळी मंदिराच्या पायऱ्यांवरून देवाला धूप दाखवून आदरांजली वाहण्याची प्रथा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मंदिर ट्रस्ट आणि काही हिंदू संघटनांनी अशी कोणतीही अधिकृत परंपरा नसल्याचे स्पष्ट केले. वाद वाढू नये आणि सामाजिक सलोखा राखला जावा यासाठी स्थानिक मुस्लिम समुदायाने नंतर या जुन्या प्रथेचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

त्र्यंबकेश्वर हे हिंदूंच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आणि हो त्र्यंबकेश्वर म्हणजेच महादेव बरं का…

https://www.abplive.com/news/india/maharashtra-nasik-trimbakeshwar-temple-sit-investigation-4-muslim-man-identity-2409824

“वाद वाढू नये आणि सामाजिक सलोखा राखला जावा” ही मुसलमान समाजाची प्रामाणिक मानसिकता असती तर १४ ऑगस्ट १९४७ रोजी आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे धर्माच्या आधारावर इतिहासात पहिल्यांदाच विभाजन होऊन वेगळा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान निर्माण झालाच नसता.

“पायरीला धूप दाखवणे ही लँड जिहादची पहिली पायरी होती. आधी पायरी मग चादर चढवण्याची प्रथा म्हणत गाभारा आणि मग संबंध त्र्यंबकेश्वर मंदिरच विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याची १०० वर्षे जुनी परंपरा फक्त स्थानिक मुसलमान समाजालाच माहीत होती. ना ती त्र्यंबकेश्वरला माहीत होती… ना त्र्यंबकेश्वरच्या सकल हिंदू समाजाला.

“वाद वाढू नये आणि सामाजिक सलोखा राखला जावा” ही फक्त संख्याबळ नसल्यामुळे सध्या केलेली शुद्ध बतावणी आहे. जर त्रंबकेश्वरच्या मुसलमानांची श्रद्धा खरीच असती तर त्यांनी सकल हिंदू समाजाला आपली १०० वर्षे जुनी परंपरा नक्कीच पटवून दिली असती पण… दुर्दैवाने त्यांनी महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या मुसलमानांनी वाचलेल्या कुराणापेक्षा एखादे वेगळे कुराण वाचलेले असावे.

तेव्हा कुठे गेली होती तुमची श्रद्धा?…

४) सोरटी सोमनाथ

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, ७२५ इ.स.वी मध्ये सिंधचा अरब गव्हर्नर अल-जुनैद याने पहिल्यांदा गुजरात मधील सोरटी सोमनाथाचे म्हणजेच महादेवाचे मंदिर उद्ध्वस्त केले होते. पण या मंदिरावर सर्वात क्रूर आणि प्रसिद्ध हल्ला १०२६ इ.स.वीमध्ये अफगाणिस्तानचा शासक महमूद गझनी याने केला. त्याने मंदिरातील अफाट संपत्ती लुटली आणि ज्योतिर्लिंगाची विटंबना केली. यानंतर अलाउद्दीन खिलजीचा सेनापती नुसरत खान (१२९७ इ.स.वी), मुजफ्फर शाह, अहमद शाह आणि मुघल सम्राट औरंगजेब (१७०६ इ.स.वी) यांनीही हे मंदिर वारंवार उद्ध्वस्त केले. इतिहासातील नोंदीनुसार, सोरटी सोमनाथ मंदिर १७ वेळा तोडण्यात किंवा लुटण्यात आले आहे. बहुदा सोरटी सोमनाथ उध्वस्त करणाऱ्या किंवा लुटणाऱ्या नराधमांनी आमच्या छत्रपती संभाजी नगरच्या “महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढणाऱ्या” मुस्लिम बांधवांपेक्षा वेगळे कुठले तरी कुराण वाचलेले असावे. अन्यथा आमची खात्री आहे की त्यांनी हा विध्वंस किंवा लूट केलीच नसती.

मीडियाचा अल् तकिया…

अल् तकिया म्हणजे “एखाद्या मुस्लिमाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा मोठ्या संकटातून सुटण्यासाठी आपली धार्मिक ओळख किंवा श्रद्धा तात्पुरती लपवणे.” या संकल्पनेचा उद्देश म्हणजे जेव्हा एखाद्या मुसलमानाला त्याच्या धर्मामुळे मृत्यूची किंवा गंभीर शारीरिक इजा होण्याची भीती असते तेव्हा इस्लाममध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी विश्वास लपवण्याची किंवा प्रसंगी खोटे बोलण्याची परवानगी दिली जाते. थोडक्यात काफिरांना वेड्यात काढण्याची किंवा फसवण्याची क्लुप्ती.

संभाजीनगरची घटना हा प्रथमदर्शनी तरी अल् तकियाचा प्रकार वाटतो. पण त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आता मीडियाचा अल् तकिया पहा. छत्रपती संभाजीनगर मधल्या मुसलमानांनी “महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढली” ही बातमी म्हणजे मीडियाचा अल् तकिया आहे. सकल हिंदू समाजाला वेड्यात काढण्याची क्लुप्ती.

जेव्हा मीडिया आम्हाला सांगते, “आतंकवाला वादाला धर्म नसतो” तेव्हा कुठलातरी एक आतंकवादी धर्म लपवण्यासाठी हे तत्त्वज्ञान सांगत असतात. हे न समजण्याएवढा सकल हिंदू समाज आता दूधखुळा राहिलेला नाही.

अन्यथा महाराष्ट्र टाइम्सने आमच्या वरील “दोन वेगवेगळ्या कुराणांच्या” प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यांनी मालवणीच्या जिहादी मुसलमानांनी घातलेल्या हैदोसाची बातमी का दिली नाही? याची जर तर्कशुद्ध उत्तरे दिली तर आम्ही त्यांचा छत्रपती संभाजी नगरच्या मुसलमानांनी “महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढली” हा दावा १००% मान्य करू. अन्यथा “महाराष्ट्र टाइम्स पत्र नव्हे मित्र” या त्यांच्या घोषणेला “महाराष्ट्र टाइम्स पत्र नव्हे मित्र नव्हे कुत्रं” असेच संबोधू.

अन्य लेख

संबंधित लेख