पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट ‘ATS’ने (दहशतवाद विरोधी पथक) आपल्या हाती घेतला आहे.

नया नगर परिसरात सुब्रतो सेन आणि मिश्रा हे २ सुरक्षारक्षक कर्तव्यावर होते. पहाटेच्या सुमारास आरोपी त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना त्यांच्या धर्माबाबत विचारणा केली. इतक्या वरच न थांबता, त्याने त्यांना ‘कलमा’ पठण करण्यास सांगितले. जेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, तेव्हा संतापलेल्या आरोपीने जवळ असलेला चाकू काढून दोघांवर सपासप वार केले.
या हल्ल्यात मिश्रा आणि सेन हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. जखमींपैकी मिश्रा यांच्यावर मीरा रोड येथील व्होकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या सुरक्षा रक्षकावरही उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपीचा जन्म मुंबईतील कुर्ला येथील असून तो मीरा रोडमध्ये एकटाच राहत होता. आरोपी २००० मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता आणि २०१९ मध्ये तो भारतात परतला होता . घटनेचे गांभीर्य आणि हल्ल्याचे स्वरूप पाहता राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) या प्रकरणात उडी घेतली आहे. आरोपीचे कोणाशी संबंध होते का किंवा तो कोणत्या विशिष्ट विचारसरणीने प्रेरित होता का, याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर मीरा रोड परिसरात अफवांचे पेव फुटले असून तणाव वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नया नगर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपीच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
व्हिक्टीम कार्ड खेळायची सुरुवात
बातमीतील “आरोपीच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जाणार असल्याचे” वाक्य म्हणजे नेहमी प्रमाणे व्हिक्टीम कार्ड खेळायची सुरुवात असल्याची खात्री पटते.
भारतात कुठेही जिहादी अतिरेकी कारवायांमध्ये मुसलमान आरोपी पकडला गेला की ताबडतोब त्याच्या बाजूने व्हिक्टीम कार्ड खेळायला सुरुवात होते. कधी तो बिच्चारा गरीब असतो. कधी अशिक्षित असतो. बुरहान वानी सारखा कधी हेडमास्तरचा मुलगा असतो. कधी तो “आधी अतिशय शांत, सज्जन,
मनमिळाऊ होता” म्हणून सांगितले जाते. तर बहुतेक वेळा तो असे करणे शक्यच नाही म्हणून त्याचे आईवडिल. नातेवाईक शेजारीपाजारी रडून रडून सांगत असतात. पण यापैकी एक माईचा लाल चुकूनही म्हणत नाही की आमच्या मुलाने अतिरेकी कारवाई केली असेल तर त्याला जागच्या जागी गोळी घाला. कधी द्या मुस्लिम आरोपीला लहानपणापासून आई नसते किंवा. वडील नसतात किंवा दोघेही नसतात. तो अनाथ असतो.
आणि आरोपीला वाचवण्याचा हुकमाचा एका असतो. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही सांगणे. मानसिक स्थिती ठीक नाही म्हटल्यावर पोलीसही आपला खाक्या दाखवत नाहीत व न्यायालयात शिक्षेतून भरीव सूट मिळते. अर्थात जास्तीत जास्त मनोरुग्णालयात त्याची रवानगी होते. आणि पुढे मानसिक स्थिती ठीक होऊन तो बाहेरही येऊ शकतो. व्हॉट ऍन आयडिया सरजी. किंबहुना मुसलमान असल्यामुळेच त्याला आरोपी ठरवले गेले आहे असाच या सगळ्यांचा सूर असतो.
अतिरेकी कारवायांसाठी कारण ठरणारे. गरीबी. अशिक्षितपणा. आई किंवा वडील किंवा दोघेही नसणे. बिघडलेली मानसिक स्थिती. हेच मापदंड लावायचे असतील तर. हिंदू समाजात याचे प्रमाण प्रचंड आहे आणि सहाजिकच अशा हिंदू समाजाने अतिरेकी कारवायांसाठी हातात शस्त्र उचलायला हवे. परंतु प्रत्यक्षात काय दिसते?. सकल हिंदू समाज निमुटपणे आपल्या नशिबी आलेले गरिबी आणि अशिक्षितपणाचे भोग भोगत असतो. त्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत असतो काबाडकष्ट करत असतो. मात्र तो कधीच अतिरेकी कारवायांमध्ये सामील होत नाही. आणि त्यातूनही चुकूनमाकून एखादा हिंदू अतिरेकी कारवायांमध्ये सापडला गेलाच. तर त्याचे आई-वडील स्पष्टपणे सांगतात. आमच्या मुलाला जागच्या जागी गोळी घाला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अतिरेकी कारवाया आणि देशद्रोह खपवून घेणार नाही.
याचा अर्थ अतिरेकी कारवायांचे मूळ गरिबी, अशिक्षितपणात, अनाथ नसण्यात किंवा मानसिक स्थिती ठीक नसण्यात नसून. आरोपीला मिळणाऱ्या धार्मिक शिक्षणात आहे. असेच अनुभवा अंती म्हणावे लागते. मीरा रोडच्या उपरोक्त घटनेतील आरोपी जैब अन्सारी हा अमेरिकेत १९ वर्षे उच्च शिक्षणासाठी आणि नोकरी व्यवसायासाठी राहिलेला आहे. याचा अर्थ तो खचितच गरीबही नाही आणि अशिक्षित नाही.
पोलीस तपासात असे लक्षात आले आहे की. हल्ला करण्यापूर्वी आरोपीने दोन्ही सुरक्षारक्षकांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला होता. याचा अर्थ त्याची मानसिक स्थिती अतिशय उत्तम होती.
दोन्ही सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारणे व त्यांना कलमा पढण्यास सांगणे
ही घटना पहेलगामच्या हिंदू नरसंहाराची आठवण करून देणारी आहे. तो अतिरेक्यांनी केलेला संघटित हिंदू नरसंहार होता. इथे प्रथमदर्शनी तरी पोलिसांना Single Wolf Attack वाटत असला तरी एखाद्या जिहादी अतिरेकी संघटनेच्या इशाऱ्यावरून केला गेलेला हा Single Wolf Attack असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात पोलीस चौकशी अगदी ही गोष्ट उजेडात येईलच.
मात्र दोन्ही जिहादी हल्ल्यांमधील Modus Operandi आणि त्यामागील उद्देश एकच आहे. काफीर अर्थात हिंदूंचा नरसंहार. या नरसंहाराने घाबरलेल्या उर्वरित हिंदू समाजाचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि अर्थातच जिहादच्या “सवाब” (पुण्यकार्य) मुळे प्राप्त होणारी (काल्पनिक) जन्नत.
पण Single Wolf Attack ची आवई उठवून एखाद्या अतिरेकी संघटनेच्या (विशेषतः ISIS) सहभागाची शक्यता असल्यास. त्या दिशेने चालू असलेल्या तपासाची दिशाभूल करण्याचा कोणताही प्रयत्न पोलिसांनी खपवून घेता कामा नये. आनंदाची बाब म्हणजे या प्रकरणाची चौकशी ATS करत असल्यामुळे. आरोपी जैब अन्सारीची पाळेमुळे खणून काढली जातील याविषयी जनतेच्या मनात कोणतीही शंका नाही.
विशेषतः त्याच्या अमेरिकेतील १९ वर्षे वास्तव्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ISIS किंवा तत्सम जिहादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या परंतु अमेरिकेतच राहणाऱ्या व्यक्ती Single Wolf Attack घडवून आणू शकतात असा इशारा खुद्द अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी दिलेला आहे. मिरा रोडचा जैब अन्सारीने केलेला जिहादी हल्ला अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्याशी तंतोतंत जुळणारा आहे. ISIS किंवा तत्सम जिहादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या झाकीर नाईक सारख्या एखाद्या मुल्ला मौलवीची प्रेरणा यामागे असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. १९ वर्षांच्या कालावधीत त्याने विदेशात जाऊन एखाद्या अतिरेकी संघटनेकडून प्रशिक्षण घेतल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच त्याला कुठून फंडिंग होत होते का. त्याचा कोणी हँडलर आहे का. याचाही सखोल तपास केला पाहिजे आणि तो होणारच आहे.
त्यामुळे ATS ने वेळ पडल्यास NIA की मदत घ्यावी मात्र आरोपी जैब अन्सारीची पूर्ण कुंडली खणून काढावी हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
त्याच्या व्हिडिओमध्ये पहेलगामच्या हिंदू नरसंहाराचे काही व्हिडिओ सापडल्याचे प्राथमिक वृत्त आले आहे. पहेलगामच्या हिंदू नरसंहारातील पर्यटकांना धर्मविचारणे व कलमा पढायला लावणे याची त्याने तंतोतंत नक्कल (modus operandi) केली आहे. तसेच हिंदू पर्यटकांनी नि:शस्त्र असल्यामुळे जिहादी अतिरेक्यांना कोणताही प्रतिकार केला नाही. हे बघून त्याला अजून चेव चढला असावा. मात्र पहेलगामच्या हिंदू नरसंहाराला मोदी सरकारने “ऑपरेशन सिंदूर” राबवून चोख प्रत्युत्तर दिले होते हे तो विसरला असावा. आता जेव्हा ATS त्याच्यावर “ऑपरेशन तंदूर” राबवेल तेव्हा त्याची बुद्धी आपोआप ताळ्यावर येईल.
पहेलगाम पेक्षाही भयंकर असा काफीरांचा नरसंहार जगभरात ISIS आणि तत्सम इस्लामी अतिरेकी संघटनांनी केलेला आहे. त्यांचेही व्हिडिओ बघितल्याशिवाय तो राहिला नसणार.
चार-पाच महिने आधीपर्यंत एका कोचिंग क्लासमध्ये रसायनशास्त्र आणि गणित विषय शिकवणारा हा आरोपी जैब अन्सारी मानसिक दृष्ट्या अस्थिर असण्यापेक्षा अत्यंत शातिर. कावेबाज आणि धूर्त असला पाहिजे. मुळात मीरा रोडला मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय असल्यामुळे त्याने मिरा रोड हे स्थान निवडले असावे. तिथे तो एकटाच भाड्याची खोली घेऊन रहात होता.
एकतर आपण या दोघांचा काटा काढला की उर्वरित हिंदू समाज घाबरून इस्लाम स्वीकारेल. आपण “गाझी” झालो की मग कयामतच्या दिवशी आपल्याला जन्नतच. असे समजत असावा. आणि समजा काही गडबड झालीच तर मीरा रोडच्या मुस्लिम बहुल वस्तीत बेमलूनपणे पोबारा करुन. कालांतराने पुन्हा या जिहादच्या सवाब (पुण्य) कार्यासाठी आपल्याला सज्ज होता येईल असे त्याचे गणित असावे.
मात्र त्याचे सगळे गणित चुकले आणि पोलीस हे काय रसायन असते हे त्याला काही तासातच कळले. पोलिसांच्या कस्टडीमध्ये पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की तो पोपटासारखा बोलू लागेल व सगळी हकीगत बाहेर येईल. एक गोष्ट मात्र निश्चित. हे प्रकरण दिसते तेवढे साधे नाही. याच्यातून अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत.
आता तर तो जिहादी लफंगा सांगतो आहे की. मला भाड्याचे घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली होती. मला कोणी घर देत नव्हते. मला नोकरी नव्हती. कुटुंबीयांशी पटत नव्हते. माझ्याशी कोणी नीट वागत नव्हते.. त्या नैराश्यातून मी हा हल्ला केला.
अरे वा रे वा. भाड्याचे घर रिकामे करण्याची नोटीस देणाऱ्या घरमालकाला किंवा. जे कोणी त्याला घर देत नव्हते. त्यांना त्याने भोसकायला हवे होते.
पण ती सगळी याची धर्म बांधव मंडळी अर्थात मोमीन होते. नैराश्यात सुद्धा आपल्या धर्म बांधवांवर हल्ला करायचा नाही हे त्याला बरे कळले.
त्यामुळे त्याने त्याच्या नैराश्याशी सुताराम संबंध नसलेल्या या दोघांना शोधले. आणि नेमके ते काफिर निघाले हा योगायोग समजायचा तर. त्यांना धर्म विचारण्याचे आणि कलमा पडायला सांगण्याचे कारण काय होते?. कारण एकच होते.
अमेरिकेत असताना त्याने रसायनशास्त्र पदवी मिळवली होती. तिथेच त्याचे एका अफगाणी वंशाच्या महिलेशी निकाह झाला आणि २ वर्षांत तलाक देखील झाला होता. ATS च्या चौकशीत आता असेही उघड झाले आहे की. दीर्घ काळापासून आहे ISIS चे व्हिडीओ आणि कंटेंट बघता बघता त्याने प्रभावित होऊन ISIS शी ऑन लाईन संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र त्याला पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून. ISISचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने हा लोन वूल्फ अटॅक केला म्हणे.
मेंदूत रक्तात हृदयात हाडात मांसात भिनलेला काफीरांच्या धर्मांतराचा “जिहाद”. आणि त्यासाठी त्याने १,४०० वर्षांपासून चालत आलेली Modus Operandi सफाईदारपणे वापरली.

इस्लाममधील “जिहाद” हा कयामतच्या दिवशी जन्नत मिळवण्यासाठी जिवंतपणी केलेली केविलवाणी धडपड असते. जन्नत म्हणजे नंदनवन. पाणी दूध मध आणि दारुच्या नद्या. सोन्या चांदीच्या विटांचा बंगला. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ७२ (virgin) हूर. दार उल इस्लाम म्हणजे सबंध जगाला मुसलमान करणे हे इस्लामचे अंतिम ध्येय आहे. भारतात याला गजवा ए हिंद म्हणतात. भारतातल्या प्रत्येक काफीराला अर्थात हिंदूला मुसलमान करणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. आणि यासाठी मार्ग आहे तो (सशस्त्र) जिहादचा. लव्ह जिहाद, लँड जिहाद ही सगळी या जिहादची मायावी रूपे आहेत.
कारण काफिरासाठी इस्लाम मध्ये तीनच पर्याय आहेत. एक तर त्याने इस्लाम स्वीकारावा किंवा. जिवंत राहायचे असेल तर जिझिया कर द्यावा (हे देखील त्या इस्लामी शासकाच्या मर्जीवर अवलंबून आहे) अन्यथा मरणाला तयार राहावे.
गैर मुस्लिमांना मुसलमान करून घेण्यासाठी केलेल्या काफीर नरसंहाराला अर्थात (सशस्त्र) जिहादला इस्लाममध्ये सवाब अर्थात पुण्यकार्य मानले गेले आहे. विशेष म्हणजे जिहाद हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य असल्याची इस्लामची शिकवण आहे. अशा सवाबला जन्नत नसीब होणे हे ओघाने आलेच.
काफिरांना अर्थात गैर मुस्लिमांना मुसलमान करून घेण्यासाठी केलेल्या काफीर नरसंहारात अर्थात सशस्त्र जिहादामध्ये जर एखाद्या जिहाद्याला यश मिळाले तर तो “गाझी” होतो. त्याला गाझी ही पदवी मिळते. आणि अर्थात जन्नत देखील. आणि समजा गैर मुस्लिमांना हिंदू करून घेण्यासाठी केलेल्या काफीर नरसंहारात अर्थात सशस्त्र जिहादामध्ये त्या जिहाद्याला अपयश आले आणि त्यात तो मारला गेला तर तो “शहीद” होतो. आणि त्यालाही जन्नत मिळते.
आपल्या लष्करातील जवान शत्रुराष्ट्राशी लढता लढता जेव्हा धारातीर्थी पडतात तेव्हा आपण सहजपणे त्यांना “शहीद” म्हणतो. वास्तविक हा त्यांच्या हौतात्म्याचा घोर अपमान आहे. धारातीर्थी पडलेल्या आपल्या जवानांना आपण “वीर बलिदानी” किंवा “हुतात्मा”च म्हटले पाहिजे. “जन्नत”च्या प्राप्तीच्या संकल्पनेने पछाडल्याशिवाय जिहादी मानसिकता तयार होत नाही. आणि मुस्लिम तरुणांची अशी मानसिकता तयार करण्यासाठी ISIS. पाकिस्तानची लष्कर ए तोयबा. झाकीर नाईकसारखे प्रवचनकार अखंड कार्यरत आहेत.
तेव्हा भारताची गुप्तचर यंत्रणा पोलीस यंत्रणा यांच्याबरोबर सकल हिंदू समाजाला देखील निरंतर सावधान आणि सतर्क राहावे लागेल. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागेल व आपल्या पोलिस यंत्रणांना सहकार्य करावे लागेल. सुसंघटित आणि बलशाली सकल हिंदू समाज हेच या सगळ्या समस्येवरचे एक मात्र उत्तर आहे.
थोर शक्तिने तुझ्या क्रूर दैत्य मर्दिले
स्नेह भक्ति शक्तिने दैन्य दुःख वारिले
पाञ्चजन्य घोष हो जाग अर्जुनापरी ।।
जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी।।