महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, फक्त ख्रिस्ती भिक्षुणी (नन्स) यांच्या धार्मिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळाच नावात ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द वापरू शकतील. इतर कोणत्याही संस्थांना हा शब्द वापरता येणार नाही. कॉन्व्हेन्ट शाळांचा मूळ इतिहास आणि उद्देशाशी सुसंगत असाच हा निर्णय आहे. कसे ते खाली पाहूच.
हल्ली असे दिसून आले आहे की अनेक हिंदू शाळा व्यवस्थापक ही आपल्या शाळेला कसलीही ख्रिस्ती धार्मिक पार्श्वभूमी नसताना शाळेच्या नावात ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द जोडत होते. त्यामुळे चकचकीत इंग्रजी शिकवणाऱ्या कॉन्व्हेन्ट शाळेत आपले मूल जाते, असा गैरसमज पालकांचा होत असे. खरे पाहता भारतीय समाज इतका भोळाभाबडा आहे, की कॉन्व्हेन्ट शाळा व्यवस्थेचे खरे स्वरूप, त्याचा इतिहास त्यांना माहितच नाही. त्यामुळे जरी केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा असे प्रस्थापित करण्यासाठी कॉन्व्हेन्ट हा शब्द शाळेच्या नावात जोडला असला तरी या प्रत्यक्षात ख्रिस्तीतर शाळांनी काहीही चांगली कामगीरी केली तरी कॉन्व्हेन्ट शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण मिळते असे मानण्याचा प्रघात वाढत चालला होता. त्यामुळेही जनतेच्या मनातील कॉन्व्हेन्ट शाळेविषयीचा आदर आणि दबदबा गेल्या तीन चार दशकांत बराच वाढत गेल्याचे पाहायला मिळते.
आता या निर्णयाच्या निमित्ताने आपण कॉन्व्हेन्ट शाळांचा मूळ इतिहास समजून घेऊ. त्यातून पालकांना शाळेच्या खऱ्या धार्मिक स्वरूपाची स्पष्ट कल्पना येईल, आपल्या मुलाला अशी विचारसरणी, एक विशिष्ठ उद्देश असलेल्या शाळेत घालावे की नाही याचा योग्य तो निर्णय पालक घेऊ शकतील. हा निर्णय सांस्कृतिक जागृती आणि पालक संरक्षणाचा भाग आहे.
या संस्थांचा ऐतिहासिक प्रवास आणि मूळ उद्देश जाणून घेतल्यास ‘सेवेच्या’ नावाखाली चालणारा सूक्ष्म धर्मप्रसार स्पष्ट दिसतो.
कॉन्व्हेंटचा मूळ संकल्पना
‘कॉन्व्हेंट’ (Convent) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘conventus’ पासून आला असून, त्याचा अर्थ ‘एकत्र राहणे’ किंवा ‘धार्मिक समुदाय’ असा होतो. तिसऱ्या-चौथ्या शतकात इजिप्तच्या वाळवंटात सेंट पॅकोमियस यांनी प्रथम ख्रिस्ती भिक्षुणींसाठी वेगळा समुदाय स्थापन केला. रोममध्ये पौला-मार्सेला सारख्या श्रीमंत विधवांनी आणि सेंट बेनेडिक्टच्या बहिणी सेंट स्कॉलास्टिका यांनी भिक्षुणी समुदायांना नियमावली दिली. मध्ययुगात फ्रान्सिस्कन, डोमिनिकन, कार्मेलाइट इत्यादी ऑर्डर्सनी युरोपभर कॉन्व्हेंट्स स्थापन केली. प्रारंभी हे समुदाय प्रार्थना आणि आध्यात्मिक साधनेसाठी होते. नंतर त्यांनी शाळा, रुग्णालये आणि अनाथाश्रम चालवण्यास सुरुवात केली.
अनाथ आणि फाउंडलिंग बालकांचे संगोपन
मध्ययुगीन युरोपमध्ये युद्धे, साथीचे रोग आणि सामाजिक अराजकता यामुळे अनौरस मुले आणि अनाथ बालके ही मोठी समस्या होती. नवजात बालकांना रस्त्यावर सोडणे सामान्य होते. ख्रिस्ती चर्चने यावर ‘फाउंडलिंग हॉस्पिटल्स’ आणि अनाथाश्रम सुरू केले. चर्चच्या भिंतीवर ‘फाउंडलिंग व्हील’ (फिरते चक्र) ठेवले जायचे. अडचणीत सापडलेल्या, मूळ सांभाळू न शकणाऱ्या माता आपले बालक तिथे ठेवून घंटा वाजवत आणि निघून जात असत. अशा मुलांना नन्स कॉन्व्हेन्ट च्या इमारतीत आणून त्यांचे संगोपन करत असत.
परंतु यातील अत्यंत हृदयविदारक आणि धक्कादायक बाब अशी की १८व्या आणि १९व्या शतकात या संस्थांमध्ये अश्या प्रकारे सोडलेल्या, सापडलेल्या या अनाथ बालकांच्या बालमृत्यूचे प्रमाण ७० ते ९९ टक्के इतके उच्च होते. इतकेच नाही तर यातून जी बालके जिवंत राहतील, त्यांना लहानपणापासून ख्रिस्ती विचार देऊन धर्मविस्तार करणे, त्यांचा ख्रिस्ती धर्मप्रचारात वापर करून घेणे, हा मुख्य उद्देश अशी कॉन्व्हेन्ट चालवण्यामागे होता. ‘सेवेच्या’ च्या नावाखाली धर्मप्रसाराची ही रणनीती अश्या प्रकारे सुरू झाली.
वसाहतवादाशी जोड आणि भारतातील प्रवेश
१६व्या शतकात युरोपियन साम्राज्यवाद वाढल्यावर कॉन्व्हेंट्स आणि मिशन्स हे महत्त्वाचे आयुध बनले. लॅटिन अमेरिका, कॅनडा आणि भारतात शिक्षणाच्या माध्यमातून स्थानिकांना ख्रिस्ती बनवण्याचे संतापजनक षडयंत्र रचले गेले. गोव्यामध्ये पोर्तुगीज काळात इन्क्विझिशन सुरू असतानाच १६०६ मध्ये रिअल कॉन्व्हेंटो द सांता मोनिका स्थापन झाले. शाळा आणि अनाथाश्रमांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात धर्मांतरण केले गेले.
सेवेचे रूपांतर पूर्ण शिक्षण व्यवसायात
१९व्या शतकानंतर कॉन्व्हेन्ट ही व्यवस्था हळूहळू व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात रूपांतरित झाली. उच्च शुल्क, आकर्षक इन्फ्रास्ट्रक्चर आणि तथाकथित ‘चमकदार, फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या शाळा’ अश्या भ्रमित करणार्या स्वरूपाच्या जोरावर साधेभोळे मध्यमवर्गीय हिंदू पालक आजही सहज आकर्षित होताना दिसतात. परंतु या सगळ्या व्यवस्थेमागील मूळ धार्मिक उद्देश कायम आहे, जो सर्वसामान्य ख्रिस्तीतर समाजाला लक्षातच येत नाही.
आधुनिक कॉन्व्हेंट शाळांमध्ये सकाळ-सायंकाळी ख्रिस्ती प्रार्थना सक्तीची असते. बायबल कथा, ख्रिस्ती चिन्हे आणि उत्सवांना प्राधान्य दिले जाते. हिंदू सांस्कृतिक चिन्हे – टिकली, गंध, मेहंदी, रामराम म्हणणे – यावर निर्बंध किंवा शिक्षा केली जाते. गरीब, दलित आणि आदिवासी मुलांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, भोजन आणि हॉस्टल सुविधांच्या प्रलोभनातून प्रभावित केले जाते. विशेषतः उत्तर-पूर्व भारत, झारखंड, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रातील आदिवासी भागात ही सूक्ष्म प्रक्रिया अत्यंत प्रभावशाली आहे.
कॉन्व्हेंट शाळांचा प्रवास ‘अनाथ बालकांच्या सेवे’ पासून सुरू होऊन आज पूर्ण विकसित ‘धार्मिक-शैक्षणिक व्यवसाय’ या स्तरापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र शासनाचा निर्णय कॉन्व्हेन्ट शाळांच्या मूळ स्वरूपाविषयी पालकांना पारदर्शकता प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.
इंग्रजी माध्यमाची शाळा आणि कॉन्व्हेन्ट शाळा या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा तुमच्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे वेगळा आहे, याची जाणीव पालकांना या निमित्ताने होणे, अत्यंत आवश्यक आहे.
हिंदू पालकांनी जागरूक राहून रामकृष्ण मिशन, विद्या भारती, सरस्वती शिशु मंदिर आणि इतर दर्जेदार शाळा निवडाव्यात. आपले मूल हे टाकलेले, अनाथ मूल आहे का? याचा विचार शाळा निवडताना जरूर करावा. कारण आपण इंग्रजी शिक्षणाच्या लोभाने कॉन्व्हेन्ट शाळा निवडत असलो तरी या शाळांचे व्यवस्थापन आपल्या मुलांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पहाते, हे वर स्पष्ट केलेच आहे. त्याचा जरूर विचार करा.
शिक्षण हा मुलांचा भविष्याचा पाया आहे. तो कोणत्याही धर्मप्रसाराचे साधन बनू नये. सांस्कृतिक वारसा जपत, मुलांना स्वाभिमानी भारतीय बनवणे हेच खरे पालकत्व आहे.
– अमिता आपटे