मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) द्वारे संचालित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) कडून प्रतिष्ठित ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम – क्लास I रेटिंग’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MIAL हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांचा संयुक्त उपक्रम असून, त्यात AAHL ची ७४ टक्के भागीदारी आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे, CSMIA आता वार्षिक ५ कोटींहून अधिक प्रवाशांची हाताळणी करणाऱ्या आणि हे प्रमाणपत्र मिळवलेल्या भारतीय विमानतळांच्या पंक्तीत सामील झाले आहे.
ही मान्यता विमानतळाची शाश्वत कचरा व्यवस्थापनाप्रती असलेली वचनबद्धता अधोरेखित करते, जिथे एकात्मिक, विमानतळ-व्यापी प्रणालींद्वारे ९९%हून अधिक कचरा जमिनीत गाडण्यापासून (लँडफिलमध्ये जाण्यापासून) रोखला जातो.
CSMIA ने कार्यक्षम वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्राप्ती यंत्रणांद्वारे सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन पद्धती लागू केल्या आहेत. ज्यामध्ये प्लास्टिक कचरा, ओला आणि सुका घनकचरा (MSW) आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू यांसारखा प्रमुख कचरा. हे सगळे लँडफिलमध्ये जाण्यापासून यशस्वीरित्या रोखले गेले आहेत. ZWL मूल्यांकनाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित केलेले हे मूल्यांकन, एकूण कचरा निर्मिती कमी करून कचरा पुनर्वापर जास्तीत जास्त करण्याच्या ZWL च्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.
विमानतळावरील कचऱ्याच्या प्राथमिक स्रोतांमध्ये अन्न, प्लास्टिक, कागद आणि कामकाजातील कचरा यांचा समावेश आहे. CSMIA ने ५R तत्त्वांवर (कमी करणे, पुनर्वापर करणे, पुनर्उद्देशित करणे, पुनर्प्रक्रिया करणे, पुनर्प्राप्त करणे) आधारित एक मजबूत, मूल्य साखळी-चालित दृष्टिकोन लागू केला आहे. ज्यामुळे लँडफिलवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी झाले आहे आणि कचरा पुनर्प्राप्तीमध्ये सुधारणा झाली आहे.
यामध्ये स्रोतावरच वर्गीकरण, पुनर्प्रक्रिया, देखरेख आणि सतत कचरा कमी करणे यांचा समावेश आहे. ज्याला एक समर्पित पर्यावरण आणि शाश्वतता टीम आणि संकलन व अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रांमध्ये हस्तांतरणासाठी सुस्पष्ट पायाभूत सुविधांचे पाठबळ लाभले आहे. ही मान्यता CSMIA च्या जागतिक शाश्वतता नेतृत्वाला अधिक बळकटी देते. ज्यामध्ये ACA लेव्हल ५ कार्बन अधिस्वीकृतीचा समावेश आहे.
गेल्या वर्षभरात, विमानतळाने १००% नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल करणे, ऊर्जा कार्यक्षमता ४०%हून अधिक सुधारणे, आपल्या जमिनीवरील विमानांच्या ताफ्याचे विद्युतीकरण करणे, ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा विस्तार करणे आणि ईएसजी (ESG) प्रशासनाला बळकट करणे यांसारख्या प्रमुख उपक्रमांद्वारे आपल्या शाश्वततेच्या आराखड्याला गती दिली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यासह, सीएसएमआयए (CSMIA) आपल्या कामकाजाच्या केंद्रस्थानी शाश्वतता समाविष्ट करून भविष्यासाठी सज्ज अशी विमान वाहतूक परिसंस्था घडवत आहे.

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक आणि शाश्वत (Sustainable) पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने ‘५R’ (Reduce, Reuse, Repurpose, Recycle, Recover) तत्त्वाचा अवलंब केला जातो. अनेक प्रमुख विमानतळे आता ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ (Zero Waste to Landfill) या दर्जापर्यंत पोहोचली आहेत, जिथे ९९% पेक्षा जास्त कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पहिल्या टप्प्यात कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा, प्लास्टिक, कागद आणि ई-कचरा यांचे स्त्रोतावरच (Source) वर्गीकरण केले जाते.
विमानतळावरील हॉटेल, लाउंज आणि खाद्यपदार्थांमधून निघणारा अन्न, कचरा, ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर (OWC) द्वारे खतात रूपांतरित केला जातो. बेंगळुरू विमानतळासारख्या ठिकाणी बायो-मेथनेशन तंत्रज्ञानाद्वारे या कचऱ्यापासून बायोगॅस (Compressed Biogas – CBG) निर्मिती केली जाते. प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी रिव्हर्स वेंडिंग मशीन (Reverse Vending Machines) वापरल्या जातात. पुनर्वापर योग्य वस्तू अधिकृत रिसायकलिंग पार्टनर्सकडे पाठवल्या जातात.
जप्त केलेल्या वस्तू, प्रतिबंधित पदार्थ आणि संसर्गजन्य कचरा (Bio-medical waste) नष्ट करण्यासाठी इन्सिनरेटर (जाळण्याचे यंत्र) वापरले जाते. जेणेकरून रोगराई पसरणार नाही आणि पक्षी विमानांच्या दिशेने आकर्षित होणार नाहीत. विमानतळावर तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक सवेज ट्रीटमेंट प्लांट्स (STP) वापरले जातात. यामध्ये SBR तंत्रज्ञान आणि RO प्रक्रियांचा वापर करून पाणी पुनर्वापरयोग्य बनवले जाते.

‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ (MIAL) सारख्या विमानतळांवर विशेष पर्यावरण आणि शाश्वतता टीम कचरा संकलन आणि त्याच्या योग्य विल्हेवाटीवर लक्ष ठेवते. थोडक्यात, आधुनिक विमानतळ आता केवळ कचरा फेकून देत नाहीत तर त्यावर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा किंवा खतनिर्मिती करण्यावर भर देत आहेत.
एकंदरीतच विमानतळावर ओला आणि सुका कचरा, प्लास्टिक आणि इतर पुनर्वापरयोग्य वस्तूंचे वर्गीकरण व पुनर्प्राप्तीसाठी सर्वोत्तम यंत्रणा राबवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे.