Wednesday, May 13, 2026

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया

Share

मे २०२६ मध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांच्या मूल्याचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग तयार करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी मालाडच्या मालवणी व गोराईच्या मनोरी मध्ये केलेल्या कारवाईत ड्रग तयार करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा कच्चा माल, रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहेत. या रसायनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग तयार करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ड्रग बाजाराला पुरवठा करण्यासाठी हा संपूर्ण कट रचण्यात आला होता.

यापूर्वी एप्रिल महिन्यात पोलिसांनी मेफेड्रोन तस्करी प्रकरणात काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करण्यात आला आणि मोठ्या साठ्याचा शोध लागला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या नेटवर्ककडून टप्प्याटप्प्याने एमडी ड्रग तयार करण्याची तयारी सुरू होती. मात्र पोलिसांना वेळेवर माहिती मिळाल्याने सापळा रचून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर ड्रग निर्मितीचा प्रयत्न थांबवण्यात यश आले आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपींच्या नेटवर्कद्वारे रसायनांचा पुरवठा कुठून होत होता याचाही शोध घेतला जात आहे. या कारवाईत एकूण १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यात २ महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ६.७७ किलोहून अधिक एमडी ड्रग्स आणि २५५ किलो विविध रसायने तसेच प्रयोगशाळेत वापरली जाणारी साधने यांचा समावेश आहे.

या प्रकरणात फिरदोस अरबाज कुरेशी नावाच्या महिलेच्या अटकेनंतर संपूर्ण नेटवर्कचा उलगडा झाला. तिच्या आणि तिच्या पतीच्या. अरबाज वकील कुरेशी याच्या चौकशीतूनच मोठ्या प्रमाणावर ड्रग निर्मितीचा कट समोर आला. पोलिसांनी आता या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे.

या अमली पदार्थ माफियांनी ड्रग्ज बनवण्यासाठी एक फॅक्टरी बनवली होती पण विशेष म्हणजे ही फॅक्टरी फिरती (mobile) होती. पोलिसांना चकवा देण्यासाठी ही मोबाईल फॅक्टरी ची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रकरणाचा मुख्य आरोपी मालवणीच्या जामा मशिदीच्या इमामाचा भाऊ आहे.

आरोपींच्या चौकशीत अक्रम खान नावाचे नाव पोलिसांसमोर आले. हा अक्रम खान आरोपींचा मूळ पुरवठादार होतामिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मालवणी आझाद नगर. गोराई मनोरी या ठिकाणी धाडी टाकल्या. आणि नंतरच्या तपासात मुंबईतील जोगेश्वरी ओशिवरा भायखळा तसेच मिरा रोड आणि गुजरातच्या राजकोट सकट विविध ठिकाणांहून आरोपींची धरपकड केली.

या माफिया रॅकेटची मोडस ऑपरेंडी जगावेगळी होती. एका ठिकाणी १२ ते १५ किलो एमडीचे उत्पादन केल्यानंतर. ते सगळा कच्चा माल (रसायने) व उपकरणे (फॅक्टरी) दुसरीकडे हलवत असत. एमडी बनवण्यासाठी लागणारी रसायने बाजारात सहज उपलब्ध असल्यामुळे. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते आपले स्थान सतत बदलत होते.

देशाच्या तरुणाईला विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थीनींना. अमली पदार्थांच्या व्यसनांमध्ये अडकवून बरबाद करणाऱ्या एका मोठ्या माफिया रॅकेटचा पर्दाफाश केल्याबद्दल मुंबई व महाराष्ट्र पोलिसांचे तसेच महाराष्ट्राच्या गृहखात्याचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे.

एकंदरीत बातमीवरून या माफिया रॅकेटचा आवाका खूपच मोठा असावायाची खात्री पटते. या माफियांनी अमली पदार्थांची एक पूर्ण इको सिस्टिमच उभी केलेली आहे. उत्पादनाबरोबर या अमली पदार्थांच्या वितरणाची सुद्धा एक मोठी साखळी या माफियांनी निश्चितपणे उभी केली असणार. त्यासाठी बेरोजगार तरुणांना चांगल्या मोबदल्याची लालूच दाखवून अडकवले जाते. त्या साखळीचाही पर्दाफाश होणे गरजेचे आहे.

काही स्थानिक मंडळींच्या सहकार्याशिवाय एवढे मोठे रॅकेट चालविणे अशक्य आहे. हे मालवणीच्या जामा मशीदीच्या इमामाच्या भावाच्या अटकेवरून लक्षात येते. यात त्या इमामाच्या तसेच पकडलेल्या इतर आरोपींच्या ठिकाणांच्या मशिदींच्या इमामांच्या सहभागाची. तसेच तयार केलेल्या ड्रग्जचा साठा करण्यासाठी मशिदींचा वापर केला गेला असण्याची दाट शक्यता आहे. कारण पोलिसांच्या नजरेत सहज न येणारे असे मशीद हे अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे. अर्थात् या सगळ्या नेटवर्कची पोलीस कसून चौकशी करतीलच.

अमली पदार्थांच्या व्यवसायात प्रचंड आर्थिक फायदा असतो. या आर्थिक फायद्यातील लक्षणीय भाग लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर जिहाद यांच्यासाठी वापरण्यात येत असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अमली पदार्थांचा व्यवसाय व जिहाद यांचे जगात अतूट नाते आहे. जगातील सर्व जिहादी आतंकवादी संघटनांना अमली पदार्थांच्या व्यापारातून भरघोस आर्थिक मदत मिळत असते हे उघड सत्य आहे. या माफिया रॅकेटची चौकशी करत असताना हा पैलू देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील देशद्रोही फरार आरोपी दाऊद इब्राहिम याने देखील आपले साम्राज्य अमली पदार्थांच्या जोरावरच उभे केलेले आहे.

तसेच राजकीय संरक्षणाशिवाय एवढे मोठे माफीया रॅकेट चालवणे अवघड आहे. अमली पदार्थांच्या या रॅकेटला कोणी राजकीय संरक्षण देत होते का याचाही तपास होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या घडत असलेल्या नाशिकच्या TCS धर्मांतर जिहादमध्ये MIM या राजकीय पक्षाचा सक्रिय सहभाग असल्याचे लक्षात येत आहे. त्याचप्रमाणे या अमली पदार्थांच्या माफी यांना कोणी राजकीय संरक्षण देत होते का? याची शहानिशा होणे जरुरी आहे.

एकंदरीतच या प्रकरणाच्या निमित्ताने कोणतीही दयामाया न दाखवता राज्यातील ड्रग्ज माफियांच्या संपूर्ण इकोसिस्टीमची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना गोळा केलेले पुरावे न्यायालयात ठोसपणे टिकतील व सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल याची देखील काळजी पोलिसांना घ्यावी लागेल. तरच या ड्रग्ज माफियांना धाक बसेल.

एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी अमली पदार्थांच्या व्यापारावर एकूणच देशभरात कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली आहे. त्याच पावलावर पावले टाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने देखील अमली पदार्थांच्या माफियांवर कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे याचे आपण स्वागतच केले पाहिजे.

अन्य लेख

संबंधित लेख