ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या मुस्लिम हुल्लडबाजांना हटकल्यामुळे दोन हिंदू युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना हरणे येथे घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बुधवारी रात्री स्थानिक बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्राचा इतिहास आणि अस्मिता येथील गडकिल्ल्यांशी घट्ट जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजवटींनी उभारलेले हे किल्ले केवळ दगड-धोंड्यांचे वास्तू अवशेष नसून ते सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जिवंत प्रतीक आहेत. मात्र, अलीकडच्या काळात दापोलीतील हरणे (सुवर्णदुर्ग) येथे घडलेली घटना या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या सद्यस्थितीवर आणि तिथे वाढणाऱ्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकते.
बकरी ईदच्या, म्हणजे २७ मे या दिवशी येथील गोवा किल्ल्यावर गोंधळ घालणाऱ्या मुस्लिम तरुणांनी, मुस्लिम समाजातील ४० पेक्षा जास्त लोकांचा जमाव घेऊन २ हिंदु तरुणांना मारहाण केली आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. २६ मे रोजी सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारावर झैन हुनैरकर आणि मुफिज सोलकर हे युवक मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करत होते. चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी त्यांना किल्ल्याचे पावित्र्य राखण्याचे आवाहन करत हटकले. या वादाचा व्हिडिओ गुरव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. याचाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, संशयितांनी आपल्या ४०-५० मुस्लिम समाजातील लोकांच्या साथीने चिन्मय आणि महेंद्र यांच्यावर लोखंडी रॉडने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा हात फ्रॅक्चर झाला असून दुसऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच पीडिताची सोन्याची साखळी चोरल्याचाही आरोप आहे.
दोन्ही हिंदु तरुण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच हरणे येथील हिंदू समाज मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमला आणि ‘रस्ता बंद’ आंदोलन करत हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे
घटनेची माहिती मिळताच स्थानिक हिंदू समाज मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमला आणि ‘रस्ता बंद’ आंदोलन करत हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत सहा जणांना ताब्यात घेतले असून, नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरील अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुरातत्व विभागाने दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई अधिक तीव्र केली आहे.
घटनाक्रम :
२६ मे
या दिवशी हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्लाचा, गोवा किल्ल्याच्या महाद्वारावर झैन असलम हुनैरकर आणि मुफिज जावेद सोलकर ही २ धर्मांध मुसलमान मुले धूम्रपान आणि मद्यपान करत आरडाओरड करत होते. चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी त्यांना ‘किल्ल्याच्या ठिकाणी सिगारेट ओढू नका’, असे सांगितल्यावर धर्मांध मुलांनी शिवीगाळ करत ते तेथून पळून गेले.
रात्री १२ वाजता
त्यांचा शोध घेतला असता मोहल्ला मशिदीजवळ ती दोन्ही धर्मांध मुले आढळली. त्यांना समज दिल्यावर त्यांनी क्षमा मागितली. त्यानंतर गुरव यांनी ‘किल्ल्यावर कुणी सिगारेट ओढू नये’, या संदर्भातील व्हिडिओ आणि लिखाण सामाजिक माध्यमांत प्रसारित केले.
२७ मे
सायंकाळी चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर हे किल्ल्यावर गेले होते. तेथे दोघे धर्मांध मुसलमान झैन असलम आणि मुफिज यांनी व्हिडिओ प्रसारित केल्यावरून गुरव अन् रघुवीर यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करू लागले. तेथे बकर्या चरण्यासाठी आलेल्या अन्य ३० ते ३५ जणांपैकी १० ते १५ धर्मांध मुसलमानांनीही गुरव आणि रघुवीर यांना मारहाण केली. यात गुरव आणि रघुवीर यांना मोठी दुखापत झाली अन् गुरव यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आक्रमणकर्त्यांनी चोरली. गुरव यांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केल्यावर दोघांना रुग्णालयात उपचारांकरता भरती करण्यात आले.
मराठी आरमाराचा सुवर्ण इतिहास: सुवर्णदुर्ग आणि कनकदुर्ग
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात, हर्णे बंदराजवळ अरबी समुद्रात वसलेला ऐतिहासिक ‘सुवर्णदुर्ग’ हा एक अभेद्य जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याला “मराठ्यांच्या मुकुटातील सुवर्णपिसे” म्हटले जाते, ज्याला नुकतीच जागतिक ओळख मिळाली आहे.१६६० मध्ये शिवरायांनी आदिलशाहीचा पराभव करून हा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्याचे बळकटीकरण केले. हा किल्ला मराठा आरमाराचे मुख्य केंद्र व सरखेल कान्होजी आंग्रे यांचे लष्करी ठाणे होता. पुढे १७५५ मध्ये पेशव्यांकडे आणि १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. ८ एकरात पसरलेल्या या किल्ल्याला २४ भक्कम बुरूज, गोमुखी बांधणीचा ‘महादरवाजा’ आणि समुद्राकडील ‘चोर दरवाजा’ आहे. आत गोड्या पाण्याचे तलाव व दारूगोळा कोठार आहेत.
सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी किनाऱ्यावरील कातळावर ‘कनकदुर्ग’, ‘फत्तेदुर्ग’ आणि ‘गोवागड’ ही दुर्गत्रयी उभारण्यात आली होती. यातील ‘कनकदुर्ग’ हा स्थलदुर्ग हर्णे बंदराजवळ असून, येथून सुवर्णदुर्गावर नजर ठेवली जात असे. शिवकाळात बळकट झालेला हा किल्लाही आंग्रे यांच्या नियंत्रणाखाली व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. हे दोन्ही किल्ले आजही मराठा साम्राज्याच्या वैभवशाली आरमारी इतिहासाची साक्ष देतात.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्यावर झालेला हल्ला ही केवळ दोन गटांतील मारहाण नसून, ती आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेला लागलेले मोठे ग्रहण आहे. चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर या हिंदू तरुणांनी किल्ल्याच्या रक्षणासाठी घेतलेली भूमिका योग्यच होती, परंतु त्यांच्यावर २५-३० जणांच्या जमावाने केलेला रक्तरंजित हल्ला अत्यंत निषेधार्ह आणि कायदेव्यवस्थेला आव्हान देणारा आहे.
पोलिसांनी या प्रकरणात ४ ते ५ जणांना ताब्यात घेतले असले, तरी सर्वच्या सर्व दोषींना अटक करून, गुन्हा सिद्ध करणे हे पोलिसांसमोरील मुख्य आव्हान आहे. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कायदेशीर कारवाई करावी, तरच हिंदू तरुणात असेच दुर्गप्रेमींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल. समाजानेही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखणे तितकेच गरजेचे आहे, जेणेकरून कोकणातील सामाजिक सलोखा अबाधित राहील.
– अपरांत कांबळे