Friday, August 7, 2026

भरकटत गेलेली वैचारिक वाटचाल : आशुतोष रांका

Share

अभिजित दीपके यांच्या वर्तुळातील आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या युवा चळवळीतील एक मुख्य सूत्रधार म्हणून आशुतोष रांका यांच्याकडे पाहिले जाते. परंतु, केवळ डिजिटल प्रसिद्धी, गोंधळ आणि सनसनाटी राजकारणावर आधारलेल्या या संघटनेच्या अंतर्गत रचनेत रांका यांची भूमिका कोणत्याही ठोस तत्त्वांपेक्षा केवळ संधिसाधूची आहे. स्वतःला अभ्यासू विचारवंत, धोरण विश्लेषक आणि तरुण पिढीचे मार्गदर्शक म्हणून सादर करण्याचा त्यांचा मोठा आव असला, तरी प्रत्यक्षात त्यांची मांडणी, रणनीती आणि सार्वजनिक वर्तन यांत बौद्धिक पोरकटपणा आणि गंभीर उणिवा स्पष्टपणे जाणवतात. एकेकाळी ‘आम आदमी पक्षा’त असणारे रांका या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांनाही न्याय मिळाला, असे मानतात.

पहिली गोष्ट म्हणजे आशुतोष रांका यांचे वैचारिक स्तरावरील सततचे भरकटलेपण. कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्याची निश्चित विचारधारा, ध्येय आणि मूल्यांवर आधारित चौकट असणे आवश्यक असते. मात्र, रांका यांच्या विचारांत काहीही सातत्य नसते. परिस्थितीनुसार आणि सोशल मीडियावरील तात्कालिक ट्रेंड्सनुसार स्वतःचे मत रातोरात बदलणे, ज्या विषयावर लोकांचे लक्ष जास्त त्यावर लगेच प्रतिक्रिया देऊन स्वतःची तुतारी वाजवणे, ही त्यांची प्रमुख कार्यशैली राहिली आहे. धोरणात्मक प्रश्नांवर सखोल अभ्यास करून ठोस पर्याय देण्याऐवजी निव्वळ लोकप्रिय घोषणाबाजी करणे आणि व्यवस्थेवर वरवरचे आक्षेप घेणे यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही रचनात्मक वा दीर्घकालीन अजेंडा नाही. रांका यांनी या आंदोलनासाठी पैसा जमा केला का आणि केला असेल तर तो कसा केला, याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे. केंद्र सरकार अशी पावले टाकत असेल, अशी आशा आहे.

दुसरे म्हणजे, सार्वजनिक आंदोलने आणि राजकीय संवाद यांमधील त्यांचा भ्रामक आव. अभिजित दीपके यांच्यासोबत काम करताना रांका यांनी मुख्य संघटनात्मक जबाबदारी सांभाळल्याचा दावा केला. प्रत्यक्षात त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवरील कामापेक्षा कॅमेरा, लाईव्ह स्ट्रीम्स आणि डिजिटल पीआर यालाच प्राधान्य दिले. चळवळीत स्वतःची एक स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्याच्या घाईत त्यांनी अनेकदा मूळ मुद्द्यांनाच बगल दिली आहे. प्रशासनाशी चर्चा करताना ठोस माहिती व सनदशीर मार्ग स्वीकारण्याऐवजी, भावना भडकावणारी वक्तव्ये करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याची त्यांची सवय चळवळीचे गांभीर्य कमी करणारी होती.

तसेच, संघटनेतील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता नसणे आणि सहकाऱ्यांशी विसंवाद यावरूनही त्यांच्यावर गंभीर आक्षेप घेतले जातात. बाहेरच्या जगाला लोकशाही, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भाषा शिकवणाऱ्या रांका यांच्या स्वतःच्याच कार्यपद्धतीत हुकूमशाही प्रवृत्ती आणि प्रसिद्धीचा अतीव हव्यास दिसून होता. सहकाऱ्यांचे श्रेय लाटणे, डिजिटल विश्वात स्वतःचे वैयक्तिक ब्रँडिंग करणे आणि संघटनेच्या मूळ ध्येयांपेक्षा स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा पुढे रेटणे यामुळे त्यांच्या विश्वासातील सहकाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. काही दिवसांनी त्यांनी राजकारणातच प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको.

एकंदरीत, आशुतोष रांका हे सखोल अभ्यास, संयम, सचोटी आणि धोरणात्मक विचारांपेक्षा केवळ सोशल मीडियाचा वापर करून झटपट प्रसिद्धी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांचे प्रतिनिधित्व करतात. चळवळीच्या माध्यमातून तरुणांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्यापेक्षा, त्या प्रश्नांचे भांडवल करून स्वतःचे राजकीय भवितव्य घडविणे, हाच त्यांचा खरा हेतू दिसतो. त्यामुळे, अभिजित दीपके यांच्या या सहकाऱ्याची प्रतिमा एका अभ्यासू नेत्यापेक्षा केवळ एक ‘प्रसिद्धिलोलुप राजकीय संधिसाधू’ एवढीच उरते…

अन्य लेख

संबंधित लेख