Saturday, November 7, 2026

तेथे कर माझे जुळती..

Share

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक म्हणून पुरुषार्थ गाजवून… मातृभूमीला स्वातंत्र्य मिळाल्याचे याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य ज्या मोजक्या स्वातंत्र्यसैनिकांना मिळाले त्यांच्यापैकी ते एक होते…

त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८४ ला महाराष्ट्रातील वर्ध्याचा… लोकमान्य टिळकांच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते…

उच्च शिक्षणासाठी व लष्करी प्रशिक्षणासाठी ते परदेशात गेले… अमेरिकेत असताना त्यांनी लाला हरदयाळ यांच्यासह मिळून ऐतिहासिक ‘गदर पक्षाची’ स्थापना केली…

पहिल्या महायुद्धादरम्यान भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी इराण-अफगाणिस्तान सीमेवर जाऊन सशस्त्र लढा दिला… ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याने त्यांच्यावर कडक पाळत ठेवली होती…

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात ते कम्युनिझमच्या विचारांकडे वळले आणि १९२१ मध्ये त्यांनी मॉस्को येथे व्लादिमिर लेनिन यांची भेट घेतली होती…

भारतात परतल्यास फाशी किंवा अंदमानची शिक्षा होण्याची शक्यता असल्याने त्यांनी मेक्सिकोमध्ये आश्रय घेतला…

तिथे त्यांनी आपले आयुष्य कृषी संशोधनाला समर्पित केले…

मेक्सिकोच्या राष्ट्रीय कृषी विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी संकरित मका, रोगप्रतिकारक गहू आणि सोयाबीनच्या नवनवीन प्रजाती विकसित केल्या…

त्यांचे हे संशोधन पुढे मेक्सिकोमधील हरितक्रांतीचा मुख्य आधार बनले…

त्यांनी मेक्सिकोत गरीब शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी शाळा सुरू केल्या आणि शेतकरी संघांची स्थापना केली…

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५५-५६ च्या सुमारास ते आपल्या मेक्सिकन पत्नी आणि मुलींसह भारतात कायमचे परतले आणि नागपूर येथे स्थायिक झाले…

या काळात त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) राजकारणात सहभाग घेतला…

तथापि, नंतरच्या काळात ते सार्वजनिक जीवनातून थोडे बाजूला झाले आणि त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान व वेदांचा अभ्यास केला…

आपल्या नागपूरच्या दसरा उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील माणिक मोती वेचून वेचून निमंत्रित करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १९५९ च्या विजयादशमी उत्सवात ते “कॉम्रेड” प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित केले गेले…

२२ जानेवारी १९६७ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांच्या कृतार्थ जीवनाची सांगता झाली…

मेक्सिकोमधील शापिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये… भारताच्या लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मेक्सिको दौऱ्यादरम्यान या पुतळ्याचे (अर्धपुतळा/Bust) अनावरण केले गेले…

भारतमातेच्या या थोर सुपुत्राची… डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची आज जयंती… त्यांना विनम्र अभिवादन !

अन्य लेख

संबंधित लेख