उत्तर प्रदेशातील कुंडा मतदार संघाचे आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया यांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातून भारतात आलेल्या ५०० हिंदू शरणार्थींना श्रीराम कथेसाठी विशेष निमंत्रण दिले आहे…
बेंती राजभवन येथील परेड ग्राउंडवर १७ ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे…
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री या ४ दिवसांच्या कार्यक्रमात श्रीराम कथेचे वाचन करणार आहेत…
राजस्थानमधील जोधपूर येथील शरणार्थी छावणीत राहणाऱ्या या हिंदू कुटुंबांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे… त्यांच्या निवासासाठी कथा स्थळाजवळ विशेष तंबू उभारण्यात येत आहेत… तसेच भोजन आणि इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था केली जात आहे…
या हिंदू शरणार्थींना केवळ रामकथेत सहभागी करून न घेता प्रयागराजमधील संगम घाट, अयोध्या धाम आणि काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शनही घडवण्यात येणार आहे. यासाठी १० बसची व्यवस्था करण्यात आली आहे…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी हिंदू शरणार्थींशी राजा भैया यांचे यापूर्वीपासून ऋणानुबंध आहेत… २०२४ मध्ये त्यांनी जोधपूरमधील शरणार्थी छावणीला भेट देऊन या कुटुंबांची भेट घेतली होती आणि त्यांना आर्थिक मदतही केली होती… दिल्लीतील मजनू का टीला परिसरात राहणाऱ्या हिंदू शरणार्थींनाही त्यांनी मदत केली आहे…
१४ ऑगस्ट १९४७ रोजी… आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे धर्माच्या आधारावर इतिहासात पहिल्यांदाच विभाजन झाले…
आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली…
आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाच्या वेळी सुमारे १ कोटी २० लाख हिंदू बांधव आपला प्राणप्रिय हिंदू धर्म वाचवण्यासाठी… आपली वडिलोपार्जित शेती, जमिन जुमला, घरदार, स्थावर जंगम मालमत्ता सोडून नेसत्या वस्त्रानिशी हिंदू बहुल भारतात आले… आणि त्यांनी आपला प्राणप्रिय हिंदू धर्म सहज वाचवला…
मात्र विभाजनाच्या वेळी नाईलाजाने आमचे जे हिंदू बांधव मागे रावीपार इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये राहिले… त्यांनी गेली जवळपास ७ दशके तिथल्या सत्ताधाऱ्यांचे… जिहादी मानसिकतेच्या मुल्लामौलवींचे आणि धर्मांध शेजाऱ्यापाजाऱ्यांचे अनन्वित अत्याचार सोसूनही आपला प्राणप्रिय हिंदूधर्म टिकून ठेवला त्यांचे खरोखर कौतुकच आहे…
या ७ दशकांच्या काळातइस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील हिंदू समाजाने आपल्या धर्मश्रद्धा टिकवून ठेवल्या… त्यात सिंहाचा वाटा रामायण आणि महाभारताचा आहे…
हजारो वर्षांपासून रामायण आणि महाभारताने आसेतुहिमालय या देशातील सकल हिंदू समाजाला एका सुत्रात बांधून ठेवले आहे… आणि विशेष आश्चर्य म्हणजे म्हणजे आमच्या या अमूल्य अशा सांस्कृतिक वारशाला भरतभूमीच्या सीमांचे देखील बंधन नाही…
१५०-२०० वर्षांपूर्वी शेतमजूर म्हणून ब्रिटिशांनी उत्तर प्रदेश आणि बिहार मधील हिंदू (आणि इतर भारतीय) शेतमजूर म्हणून वेस्ट इंडीजला नेले… त्यांनी देखील आजतागायत आपल्या धार्मिक श्रद्धा रामायण आणि महाभारताच्या आधारावर टिकवून ठेवल्या आहेत… त्याचीही या निमित्ताने आठवण होते…
सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाच्या…
मेरे मन मे बसे है राम,
मेरे तन में बसे है राम ॥
या अपरंपार श्रद्धेचाच प्रत्यय आपल्याला या घटनेतून येतो…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने CAA (Citizenship Amendment Act – नागरिकत्व सुधारणा कायदा) हा कायदा
भारताच्या संसदेत संमत करून घेतला आणि…
इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तसेच बांगलादेश या ३ शेजारील देशांमधील धार्मिक छळामुळे भारतात आश्रयाला आलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला केला…
या तीनही देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन या बिगर-मुस्लिम समुदायांच्या लोकांना या कायद्यानुसार नागरिकत्व दिले जाते…
या कायद्यानुसार जे शरणार्थी ३१ डिसेंबर २०१४ किंवा त्यापूर्वी भारतात आले आहेत, त्यांनाच हा कायदा लागू होतो…
शिवाय भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेला वास्तव्य काळ (Residency requirement) ११ वर्षांवरून कमी करून ५ वर्षे करण्यात आला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढाकारामुळे आपल्या शेजारील मुस्लिम व मुस्लिम बहुल देशातील शरणार्थी हिंदूंना आज भारतात सन्मानाने नागरिकत्व मिळाले आहे…
आणि आज त्यांच्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या धार्मिक श्रद्धा अधिक बळकट करण्यासाठी रामकथांमध्ये त्यांना सन्मानाने निमंत्रित करणाऱ्या आयोजकांचे आपण अभिनंदन केले पाहिजे.
हे राष्ट्र संकटंशी लढले अनेक वेळा
कोणी न जिंकले हे भासे अजेय काळा
आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमर याला
जरी तोडिले बळाने तरी स्पर्शितो नभाला
त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे॥
आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे ॥
जय श्रीराम🙏🚩🌹