Wednesday, October 23, 2024

शिवसेना शिंदे गटाचे 45 उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोण कुठून लढणार?, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 : शिवसेना (Shivsena) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 (Maharashtra Assembly 2024) साठी अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने पहिल्या यादीत 45 उमेदवार जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील.

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी

कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
साक्री (अज) – मंजूळाताई गावित
चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरू – संतोष बांगर
जालना – अर्जून खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट
पैठण – विलास भूमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर
माहिम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग- महेंद्र हरी दळवी
महाड- भरतशेठ मारुती गोगावले
उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव- महेश शिंदे
पाटण- शंभूराज देसाई
दापोली- योगेश कदम
रत्नागिरी- उदय सामंत
राजापुर- किरण सामंत
सावंतवाडी- दीपक केसरकर
राधानगरी- प्रकाश आबिटकर
करवीर- चंद्रदिप नरके
खानापुर- सुहास बाबर

अन्य लेख

संबंधित लेख