Tuesday, September 17, 2024

राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न…

Share

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. या प्रकरणावरून रविवारी महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन केले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याविरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, असं खैरे यांनी म्हटलं आहे, त्यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती, मोठमोठे नेते दंगलीची भाषा करत होते, त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, त्यांना महाराष्ट्र शांत नकोय, राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न लोकसभेपूर्वी देखील झाला आहे. मात्र, राज्यातील जनता सुज्ञ आहे, संयमी आहे, म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत असल्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खैरेंना दिलं आहे.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते

“कोणत्याही गावात कोणताही पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असो, त्या पुतळ्यांना वेगळ्या संदेश रूपाने काही केलं तर दंगली होतात, आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, झाल्या पाहिजेत. आज आम्ही महाविकास आघाडी मिळून जोडो मारो आंदोलन करत आहोत, पोलिस येऊ द्यात आता 40 वर्षांत आम्हाला सवय झाली आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं हेत.

अन्य लेख

संबंधित लेख