चांदिवली परिसरातील एका दलित हिंदू कुटुंबाचा छळ करण्यात आल्याचा तसेच त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर काही व्यक्तींनी या कुटुंबाच्या घरात घुसून हिंदू देवदेवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याचाही आरोप कुटुंबाने केला आहे.
संबंधित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांना सातत्याने त्रास देण्यात येत होता. या प्रकारानंतरही पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पीडित कुटुंबात तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांनी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला.