महाराष्ट्रातील उर्जा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड तसेच टोरेंट पॉवर लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह, काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सामंजस्य करारांचे तपशील
जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड
भिवबंदर (आघारी गाव), ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.
✅ प्रस्तावित स्थापित क्षमता – 2800 मेगावॅट
✅ प्रस्तावित गुंतवणूक – ₹44,000 कोटी
✅ रोजगार संधी : 8000 ते 10,000
🔸 टोरेंट पॉवर लिमिटेड
रत्नागिरी जिल्हा किंवा महाराष्ट्रातील अन्य योग्य ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.
✅ प्रस्तावित स्थापित क्षमता – 1400 मेगावॅट
✅ प्रस्तावित गुंतवणूक – ₹35,000 कोटी
✅ रोजगार संधी : 1700
यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार अभिमन्यू पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील उर्जा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड तसेच टोरेंट पॉवर लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या करारात जे एस डब्ल्यू यु एनर्जी लिमिटेड यांच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिवबंदर येथे प्रस्तावित असून त्याची क्षमता 4*700 मेगावॅट म्हणजेच एकूण 2800 मेगावॅट इतकी आहे. प्रकल्प दोन टप्प्यात राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 1400 मेगावॅट आणि दुसरा टप्प्यात 1400 मेगावॅट क्षमतेची निर्मिती प्रस्तावित आहे.
सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर पंप्ड स्टोरेज प्रकल्पही मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येत आहेत. टोरेंट पॉवरचा कर्जत येथील प्रकल्प ही महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. अखंडित वीज पूरवठ्यासाठी आवश्यक मूलभूत वीजभाराच्या विचार करता अणुऊर्जा हा प्रभावी आणि स्वच्छ पर्याय आहे. असेही फडणवीस यांनी सांगितले. अणुऊर्जा क्षेत्रात राज्याने यापूर्वी केंद्र सरकारच्या तसेच खाजगी कंपन्यासोबत तीन करार केले आहेत. अमेरिकेतील प्रमुख अणुऊर्जा कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबतही या संदर्भात चर्चा झाली असून त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुकता दर्शवल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.