आज काँग्रेस पक्षाचे राजपुत्र करवीर नगरी अवतरले होते. आले होते तेच एक अजेंडा घेवून. त्यांना त्यांच्या परकीय शक्तींनी शिकवलेल्या अजेंड्या नुसार ते बोलले. पण हे बोलताना त्यांनी जो निर्लज्ज पणा दाखवला आहे त्याला जगात कुठेही तोड नाही.
इतके दिवस संविधान पूजनीय आंबेडकर यांच्याशी जोडून समाजातल्या एका घटकाला भ्रमित करण्याचे उद्योग केले. वास्तविक पूजनीय बाबासाहेब यांचा अपमान संधी मिळेल तिथे ह्या राजपुत्राच्या पणजोब्याने केला. कंटाळून त्यांना मंत्री परिषदेचा राजीनामा द्यायला लावला. भंडारा मतदार संघातून याच काँग्रेसने त्यांचा पराभव केला. पण तरी आव असा आणला की जणू काही बाबासाहेब आणि काँग्रेस एकच विचारधारा आहेत.
आता संविधान महाराजांशी जोडले आहे आणि पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी घटकाला चुचकारण्याची खेळी सुरू केली आहे. हरकत नाही पण एकदा तरी स्वतःच्या गिरेबान मध्ये झाकून पाहणार की नाही ?
ह्याच्या पणजोबाने नाही नाही ते बोल आमच्या आराध्य देवतेला, छत्रपतींना लावले तेंव्हा त्यांच्या मागे गोंडे घोळणारे लाचार काँग्रेसी गप्प राहिले. सत्तेची साधने उपभोगत असताना ह्या काँग्रेसी मांडलिकानी रायगड, शिवनेरी, प्रतापगड, विशाळगड ह्या ऐतिहासिक स्मारकाचे रूपांतर भग्न अवशेषात केले. अफजलखानाचे उरूस चालू ठेवताना याना लाज नाही वाटली. छत्रपतींचा इतिहास हिंदू militancy जन्माला घालतो हे ज्ञान ह्या राजपुत्राला ह्याच्या खानदानी संस्कारातून प्राप्त झाले. त्याच्या आधारावर ह्यांनी पक्ष वाढवला, निवडणुका जिंकल्या लोकांना मूर्ख बनवले. आज तोंड वर करून आम्हाला शिवाजी महाराज शिकवतो आहे.
ज्या संविधानाचे पुस्तक घेवून हा नाटके करतो आहे त्या संविधानाची खरी चिरफाड ह्याचा पणजोबा, आजी, पिताश्री आणि आईने केली आणि हा आम्हाला शहाणं पण शिकवतो. ३७० आणि ३५ A ह्या दुरुस्त्या कुणी आणल्या ? त्या आधारे काश्मीरमध्ये आमच्या दलीत बांधवांचे आरक्षण कुणी नाकारले ? पहिली घटना दुरुस्ती सेन्सॉर आणि प्रेस संदर्भात ह्याच्या पणजोबा ने का केली ? आर्टिकल ३५६ वापरून लोकनियुक्त सरकार जास्तीत जास्त वेळा कुणी बरखास्त केली ? आणीबाणीचा काळा डाग संविधाना ला कुणी लावला ? धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे शब्द चोरून घटनेत आणताना पूजनीय बाबासाहेब यांच्याशी द्रोह कुणी केला ? शहाबानो ह्या गरीब महिलेला सुप्रीम कोर्टाने न्याय दिला असताना पाशवी बहुमताने तिचा हक्क नाकारण्यासाठी घटना दुरुस्तीचे पाप कुणी केले ?
राहुलबाबा ,सर्वात जास्त संविधानाचा अपमान तर तुझ्या खानदानाने आणि पक्षाने केला ! UPA काळात घटनाबाह्य सत्ता केंद्र कुणी निर्माण केले आपल्या मातोश्रीने ना ? मग का इतके खोटे बोलता ?
शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबद्दल बोलताना त्यांचा राज्याभिषेक कधी झाला हे तरी ह्याला माहिती आहे का ? डावे , लुटियन आणि बामसेफी यांचा अजेंडा घेवून खोटे बोलत कशाचे काही संबंध जोडण्याचा हा कुटील डाव कशासाठी ? मतांच्या साठी ? हिंदू समाजाला भ्रमित करून त्यांच्यात फूट पाडून सत्तेचे मालिदे खाण्याची गिधाडी वृत्तीचे बीभत्स ओंगळवाणे दर्शन महाराष्ट्राला आज ह्या राजपुत्रा च्या रूपाने पाहायला मिळाले.
हो महाराजांच्या संस्काराचे प्रतिबिंब जरूर घटनेत आहे कारण तेथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिंतनातून भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्रित आली. पूजनीय बाबासाहेब यांनी छत्रपतींच्या संस्कृत राजमुद्रे पासून प्रेरणा घेवून संस्कृत भाषेचा पुरस्कार केला. काँग्रेसने काय केले ?संस्कृत भाषा कशी मृत होईल असे धोरण आखले. महाराजांनी गानिमाला कधी माफ केले नाही. पण राहुल बाबा तुझ्या आजीने १९७१ साली पाकिस्तानी शरण आलेल्या सैन्याला बिनशर्त माफ केले. छत्रपतींचे आराध्य दैवत काशी विश्वेश्वर आणि प्रभू रामचंद्र यांचा अपमान गांधी खानदानाने नेहमीच केला आणि आज तोंड वर करून ज्यांनी महाराजांचे जीवन आदर्श मानून आपले जीवन पणाला लावले त्यांना शहाणपण शिकवायला निघाला ?
हे बहाद्दर पुतळ्यांच्या बद्दल बोलले. लखनौ विद्यापीठात , आग्र्याला ताजमहलासमोर आणि सुरत येथे शहराच्या प्रवेशद्वारापाशी छत्रपती शिवराय यांचे भव्य पुतळे कुणी उभे केले ? कुठल्या विचारधारेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला ? ह्याचे उत्तर देण्याची हिंमत हा खोटारडा राजकुमार दाखवणार नाही. श्री शैलम येथे शिवरायांचे भव्य स्मारक कुठल्या विचारधारा असणाऱ्या लोकांनी उभे केले ? ह्याचा थोडा ही अभ्यास ह्या गृहस्थाच्या चिंतनात नाही. केवळ खोटे बोलणे आणि रेटून बोलणे ह्या एकाच तत्त्वावर ह्यांचे राजकारण चालू आहे.
छत्रपती शिवराय यांच्या ३०० व्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात सर्व खेड्यात शिव संदेश पोहचविणारे कोण होते ? राहुल गांधी आणि काँग्रस कडून ज्या विचारधारेला दिवस रात्र पाण्यात पाहते त्या संघाचे ते स्वयंसेवक होते. छत्रपतींचा राज्याभिषेक दिन सर्व अखिल भारतात आणि जेथे जेथे हिंदू आहे त्या देशात साजरा होतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या संघटनेकडून हे ह्या नादानाला समजले तरी त्याचा काही उपयोग नाही.
ज्या सावरकरांना उठता बसता हा माणूस शिव्याशाप देतो त्या सावरकर यांची महाराजांच्या प्रती असणारी शिव भक्ती ह्याला कधीच कळणार नाही. जर महात्मा गांधी आणि शिवाजी महाराज एकच काळात जन्माला आले असते तर ह्या राजकुमार गांधीने कुणाला निवडले असते ? शिवाजी महाराज यांचे तावज्ञान आमचे आणि टिपू सुलतान पण आमचा हा दुटप्पीपणा आता खपवून घेण्याचे कारण नाही.
खिलापत आंदोलनाची शताब्दी साजरी करणारे, गायीची हत्या, महोत्सव म्हणून साजरी करणारे ह्यांना गोपालक छत्रपती शिवराय यांचे नाव घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज याना प्राण प्रिय असलेल्या भगव्या ध्वजा बद्दल यत्किंचितही आदर नसणाऱ्यानी महाराजांच्या बद्दलचे पांडित्य आम्हाला पाजळू नये आणि ज्यांच्या कानावर महाराजांची घोषणा ‘ हर हर महादेव ‘ ही ऐकू गेली की त्यांचे कान बधीर होतात त्यांनी शिवप्रेम असल्याचा खोटा आव पण आणू नये.
आश्चर्य हे आहे की हा सगळा बकवास चालू असताना छत्रपती यांचे वंशज शांतपणे सगळे ऐकून घेत होते. महाराष्ट्राच्या मातीचे आणखी दुर्दैव काय म्हणावे ? धर्मवीर संभाजी राजे याना असह्य यातना देवून त्यांना मारणारा , शिवरायांना अटक करून ठेवणारा पापी औरंग्या ज्यांना अत्यंत प्रिय आणि प्रतस्मरणीय आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेली ही वारस मंडळी आपण बघतो तेंव्हा असंख्य शिवभक्तांच्या ह्रदयात वेदनेचे काहूर माजते. मन विषण्ण होवून जाते.
माणसाने किती ढोंगी असावे? किती निरलजजा असावे ? ह्याचे अंतिम टोक ह्या गृहस्थाने काढले आहे.हिंदू समाजाने त्याला, त्याच्या पक्षाला आणि त्याच्या सर्व आघाडी मित्रांना विधानसभेत मतांच्या द्वारे सणसणीत चपराक देण्याची वेळ आली आहे. आशा आहे की सुजाण हिंदू समाज सर्व भेद विसरून हे करेल.
रवींद्र मुळे