Wednesday, December 4, 2024

गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

Share

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीवाला धोका असून तसे कट रचले जात आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी राज्यातील यंत्रणांना यासंदर्भात माहिती दिल्याचे समजते.

त्यानंतर सतर्क झालेल्या राज्याच्या पोलिस दलाने तत्काळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन’चे १२ जवान हे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान, नागपूर येथील निवासस्थान तसेच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्यात येणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख