Wednesday, November 13, 2024

सरकारचा मोठा निर्णय आता मुंबईत हलक्या वाहनांसाठी टोल फ्री

Share

मुंबईकरांसाठी आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांसाठी महत्त्वाची बातमी आहे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. हा निर्णय 13 ऑक्टोबर 2024 च्या रात्री 12 वाजता लागू होणार आहे.

हे नाके आहेत:
दहिसर टोल नाका
मुलुंड टोल नाका
वाशी टोल नाका
ऐरोली टोल नाका
आनंदनगर टोल नाका

हा निर्णय मुंबईतील वाहतूक खर्च कमी करण्यासाठी ही एक मोठी पावले आहे. या टोलमाफीमुळे नागरिकांना रोजच्या वाहतुकीतून काही पैसे बचत होणार आहे आणि मुंबईतील आर्थिक दृष्ट्या हे वरदान ठरेल. मुंबईतील वाहनचालक, व्यवसायिक, आणि दैनंदिन वापरकर्ते यांना हा निर्णय खूप उपयुक्त ठरणार आहे.

टोल माफीच्या या निर्णयाने मुंबईच्या वाहतुकीत सुधारणा करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणून घेतला जातो.

अन्य लेख

संबंधित लेख