Thursday, November 7, 2024

महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेच

Share

महाराष्ट्र लोकसभा २०२४ : देशातभारत लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान होणार आहे. महायुतीमधील अनेक जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दरम्यान, मरत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha constituency) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) भाजपाने (BJP) उमेदवारी जाहीर केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेने या जागेवर दावा केला होता. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. परंतु आता नारायण राणे आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात थेट लढत होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख