Thursday, October 10, 2024

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Share

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
ध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाचं भूमिपूजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातल्या तारांगणाचं उद्घाटन, विविध रस्ते तसंच विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं ई भूमिपूजन होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख