Wednesday, September 9, 2026

न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायाधीश

Share

न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. ते उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायाधीश असतील. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते.

न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९९२ मध्ये त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि प्रामुख्याने दिवाणी खटले (सिव्हिल लॉ) क्षेत्रात वकिली केली. २०१३ मध्ये त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि २०१५ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले.

अन्य लेख

संबंधित लेख