
पुण्यातील राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा केवळ एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आयोजित केलेला कार्यक्रम आहे. अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली.
पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात केवळ काँग्रेसशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींनीच उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ सकारात्मक बाजू मांडण्यासाठी ‘इन्फ्लुएन्सर्स’ना पैसे दिले जात असल्याचे आणि तसे करण्यास सांगितले जात असल्याचे समोर आल्यावर त्यांचे खरे स्वरूप उघड झाले… माझ्या मते, हा विद्यार्थ्यांचा खरा आवाज नाही; तर हा राहुल गांधींचा ‘री-लॉन्च’ (पुन्हा नव्याने मांडण्याचा) प्रयत्न आहे.” असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादात म्हटले आहे.