महाराष्ट्र : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अडवल्याने भारताचा गॅस पुरवठाही प्रभावित झाला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने व्यावसायिक वापराऐवजी घरगुती वापराला प्राधान्य दिले असले तरी, गॅस बुकिंगची मुदत (Window) आता २१ दिवसांवरून २५ दिवसांवर करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी फोन कॉलद्वारे बुकिंग करण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, गॅस कंपन्यांनी सिलिंडर बुक करण्यासाठी इतरही अनेक सोपे आणि डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
१. व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे बुकिंग
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून खालील क्रमांकांवर मेसेज पाठवून तुम्ही बुकिंग करू शकता.
Indane: 7588888824 वर “REFILL” मेसेज पाठवा.
HP Gas: 9222201122 वर ‘Hi’ किंवा ‘Book’ मेसेज करा.
Bharat Gas: 1800224344 वर ‘Hi’ किंवा ‘Book’ मेसेज करा.
२. मिस्ड कॉल (Missed Call) सेवा
इंटरनेट नसले तरी तुम्ही या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सिलिंडर बुक करू शकता.
Indane: 8454955555
Bharat Gas: 7710955555
HP Gas: 9493602222
३. SMS द्वारे बुकिंग
नोंदणीकृत क्रमांकावरून खालील नंबरवर एसएमएस पाठवा.
Indane: 7718955555 वर ‘REFILL’ लिहून पाठवा.
Bharat Gas: 7715012345 किंवा 7718012345 वर ‘LPG’ लिहून पाठवा.
४. मोबाईल ॲप्सचा वापर
जर वरील पर्याय काम करत नसतील, तर तुम्ही Paytm, PhonePe, Amazon Pay किंवा सरकारच्या UMANG ॲपवरूनही सहज बुकिंग करू शकता.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही परिस्थिती तात्पुरती असून, नागरिकांनी घाबरून न जाता उपलब्ध डिजिटल माध्यमांचा वापर करून आपले बुकिंग करू शकता.