Saturday, May 30, 2026

संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते…

Share

शिवसेना (उबाठा) चे ब्रम्हांड प्रवक्ते, त्या पक्षाच्या मुखपत्र सामनाचे सर्वज्ञानी संपादक आणि निसटता विजय मिळवून राज्यसभा खासदार झालेले संजय राजाराम राऊत यांनी…  काल शुक्रवार, २८ मे २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त अभिवादन करणारे ट्विट केले…

बहुदा हे ट्विट त्यांनी राहुल गांधी यांच्या नकळत केले असावे… कारण परवानगी मागायला गेले असते तर संजय राजाराम राऊत थपडा खाऊनच परत आले असते…

ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधी कायम “माफीवीर”,

“ब्रिटीशांचे एजंट”, “ब्रिटिशांकडून पेन्शन घेणारे” म्हणून हिणवत असतात… ते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त अभिवादन करणारे ट्विट करायची परवानगी देणे शक्यच नाही…

आणि तशी परवानगी मागण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घरगड्याची… संजय राजाराम राऊत यांची हिंमत देखील नाही… कारण राहुल गांधी हे त्यांचे परात्पर घरमालक (घरमालकाचे घरमालक) आहेत…

घरगड्याने परात्पर मालकाकडे अशी परवानगी मागणी म्हणजे थपडा खाणेच होते…

असो… आपल्या ट्विटमध्ये संजय राजाराम राऊत हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुणगौरव करताना, त्यांना…

त्याग साहस तेज हिंदुत्व आणि देशाचे अखंडत्व यांचे प्रतीक असे संबोधून त्यांना “महान देशपुत्र” म्हणतात…

आणि सत्तेसाठी संजय राजाराम राऊत ज्या राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात… ते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर

सावरकरांना कायम “माफीवीर”, “ब्रिटीशांचे एजंट”, “ब्रिटिशांकडून पेन्शन घेणारे” म्हणून अपमानित करत असतात…

मग एकदा संजय राजाराम राऊत हे राहुल गांधी यांना स्पष्टपणे ठणकावून का सांगत नाहीत की…

आदरणीय राहुलजी, स्वातंत्र्यवीर सावरकर साहसी होते… ते ब्रिटिशांची माफी मागणे शक्यच नाही…

स्वातंत्र्यवीर सावरकर तेजस्वी होते… ते ब्रिटिशांचे एजंट असणे  शक्यच नाही…

स्वातंत्र्यवीर सावरकर त्यागी होते… ते ब्रिटिशांची पेन्शन घेणे शक्यच नाही…

समजा प्रत्यक्ष भेट घेऊन हे सांगणे शक्य नसले तरी… संजय राजाराम राऊत आपले ट्विट राहुल गांधी यांना टॅग करू शकत होते… हेतू नक्कीच साध्य झाला असता…

पण ते तसे करणार नाहीत…

कारण संजय राजाराम राऊत ज्या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार आहेत… तो पक्ष राहुल गांधी यांच्या पक्षाची तैनाती फौज (खरं

म्हणजे लाचार सेना) म्हणून राजकारणात आपले अस्तित्व टिकवून आहे… आणि अलबत्ता संजय राजाराम राऊत हे काँग्रेसच्या तैनाती फौजेतील एक मनसबदारी सरदार आहेत… यापेक्षा काँग्रेसच्या लेखी त्यांची किंमत जास्त नाही…

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे… रोज सकाळी मीडियाच्या बूम समोरदेशाच्या पंतप्रधान गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावाने बूमाबूम करून घामाघूम होणाऱ्या संजय राजाराम राऊत यांच्याकडे ती नैतिकता नाही…

२०१९ साली महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल पायदळी तुडवून… भारतीय जनता पक्षाशी आपली निवडणूकपूर्व असलेली युती तोडून… क्षणभंगुर सत्तेच्या लालसेपायी ज्या प्रकारे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पायावर लोळण घेतली…

आणि २०२६ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडी मोडीत काढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी घरोबा केला…

त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातच नाही तर राहुल गांधी यांच्या मनात देखील “गद्दार” अशीच उभी

राहिली आहे…

याला कारण स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत… औटघटकेच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी कमरेला गुंडाळलेले हिंदुत्वाचे भरजरी वस्त्र सोडून डोक्याला गुंडाळले… “लाचारीशी जडले नाते” अशी त्यांनी आपली आपण दयनीय अवस्था करून घेतली आहे…

आणि एका गद्दाराची कवडीमोल किंमत काय असते ते महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे…

संजय राजाराम राऊत परवानगी मागायला गेले असते तर राहुल गांधी यांनी देखील ती संधी सोडली नसती… हे त्यांना देखील पुरेपूर ठाऊक आहे…

कदाचित आपल्या पक्षाने हिंदुत्व सोडल्यामुळे त्याचीही केविलवाणी स्थिती झाली आहे… याची जाणीव विधानसभेतील लाजिरवाण्या पराभवानंतर लाचार सेनेच्या नेतृत्वाला झाली असावी…

आणि आपले राजकीय अधःपतन रोखण्यासाठी आपण अजून  हिंदुत्व सोडलेले नाही हे सकल हिंदू समाजाला दाखविण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जयंती निमित गुणगान करण्या एव्हढी दुसरी सुवर्णसंधी दुसरी नसेल…

आणि कदाचित नेमकी तीच सुवर्णसंधी संजय राजाराम राऊत यांनी साधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असावा…

पण बूंद सो गयी सो हौद से नही आयेगी… संजू मियां…

अन्य लेख

संबंधित लेख