Saturday, June 27, 2026

मीरा-भाईंदरमध्ये  बनावट रेशन कार्डच  रॅकेट उध्वस्त ! 

Share

मीरा भाईंदर मधील शिधापत्रिका कार्यालय क्रमांक 41 फ येथे नया नगर पोलिसांनी पकडलेला दलालीचा रॅकेट हे भाईंदर पूर्वेकडे इंदिरा गांधी उड्डाणपुलाखालील शिधावाटप कार्यालय आहे व तिथे ही टोळी सक्रिय होते. गेल्या चार ते पाच वर्षापासून हे दलालीचा रॅकेट सक्रिय आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड वेगाने विकास झाल्याने  मुंबई ठाणे पालघर कोकण या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिकांचा ओघ वाढतोय. दुसऱ्या बाजूला बघता स्थानिक स्तरावर जुन्या  इमारतींच्या पुनर्बांधणीची काम 60-70 टक्क्यांहून अधिक सुरु आहेत. त्यामुळे या सर्व नागरिकांना सरकारी कागदपत्रांच्या वैधतेसाठी वारंवार  सरकारी कार्यालयात जाव लागत.

अशा काळात  सरकारी कर्मचारी यांची संख्या कमी पडल्याने सरकारी  कार्यालयामध्ये गैर कारभार करणारे किंवा अवैध कारभार करणाऱ्या टोळ्या सक्रिय होतात. सध्या अवैध काम करणाऱ्या टोळ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये पेव फुटलेल आहे. अशाच प्रकारची  एक टोळी मीरा-भाईंदर मधील शिधावाटप कार्यालया मध्ये पोलिसांद्वारे जेरबंद केली आहे. कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून, त्यांना धमकवून पैसे उकळण्याच काम हे दलाल करत होते. याप्रकरणी कार्यालयातील अधिकारी गणेश किरपाणे यांच्या तक्रारीवरून नया नगर पोलिसांनी नितीन जाधव, इस्माईल मोहम्मद सय्यद, विकास पाटील आणि मीना ठाकूर या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

TISS चा धक्कादायक अहवाल

बनावट कागदपत्रांच्या गैरव्यवहारातून बाहेरील देशातून भारतात होणारी अनधिकृत घुसखोरी आणि त्या माध्यमाने मिळवले जाणारे सरकारी ओळखीचे पुरावे हा देशाच्या अंतर्गत सुरक्षे पुढील अत्यंत गंभीर आव्हान बनला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने  सादर केलेल्या  “Illegal Immigrants to Mumbai: Analysing Socio-economic and Political Consequences” या अहवालात अनधिकृत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात धक्कादायक निरीक्षण नोंदवली होती. मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, धारावी, मालवणी या भागात भारताच्या बाहेरून आलेले घुसखोर सुरुवातीला आश्रय घेतात. स्थानिक दलालांच्याद्वारे बनावट जन्म दाखले,  भाडेकरार तयार करतात. पुढे नवीन आधार कार्ड व शिधापत्रिका यांच्या माध्यमाने मतदार ओळखपत्र बनविली जातात हे या अहवालात नमूद आहे.

अनेक बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी त्यांच्या देशी पाठवल्यावर पुन्हा ते फिरून मुंबईमध्ये येतात त्याचं एक जिवंत उदाहरण मुंबईमध्ये बघितला गेल. गेटवे ऑफ इंडिया इथे फिरणाऱ्या एक बाई त्यांना हटकलं असता त्यांनी धारावी परिसरामध्ये राहते असं सांगितलं. त्यांचे कागदपत्र ही बनावट असल्याकारणाने त्यांना बांगलादेशामध्ये पाठवल. परंतु काही दिवसांनी त्या फिरून मुंबईमध्ये आल्या. अशा प्रकारची अनेक उदाहरणं मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी बघायला मिळतात. 

दिंडोशीतील 443 बनावट रेशन कार्ड्सचे रॅकेट

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2024 मध्ये दिंडोशी मध्ये बनावट रेशन कार्ड आणि एम एम आर डी ए च्या बनावट वाटप पत्रांच रॅकेट उध्वस्त केलं होतं. पोलिसांनी तब्बल 443 बनावट रेशन कार्ड, शेकडो बनावट रबर स्टॅम्प, एम एम आर डी ए ची बनावट पत्र जप्त केली होती.

हीच घुसखोरी पुढे अतिरेकी कारवायांमध्ये आपल्याला दिसून येईल. मीरा-भाईंदर मध्ये जाएब जुबेर अन्सारी या परदेशी नागरिकाने राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन या दोन सुरक्षा रक्षकांना अडवून  चाकूच्या धाकावर कलमा वाचायला सांगितले होते. सुरक्षारक्षकांनी कलमा पठण करण्यास नकार दिल्यावर  संतापलेल्या अन्सारीने त्यांच्यावर चाकूने जीवघेणे हल्ले केले. तपासात समोर आल की आरोपी अन्सारी हा इंटरनेटच्या माध्यमातून हिंसक, कट्टरतावादी आणि इसिस (ISIS) संबंधित विचारांच्या प्रभावाखाली होता. याशिवाय, मीरा-भाईंदर आणि परिसरातील नालासोपारा, वसई पट्ट्यात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांच्या अवैध आणि संशयास्पद कारवाया वारंवार समोर येत आहेत.

मीरा -भायंदर मध्ये लोकसंख्येमध्ये झालेली वाढ हा अचानक होणारा बदल भारताच्या दृष्टीने सुरक्षेचा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे.मीरा-भाईंदरची लोकसंख्या 2011 मधील सुमारे 8.०9 लाखांवरून 2026 मध्ये अंदाजे 12 लाखांच्या पार गेली आहे. 

गुन्ह्यांचे प्रमाण आणि स्वरूप 

2012 मध्ये मिरा-भाईंदरचा परिसर ठाणे ग्रामीण पोलीस (Thane Rural) च्या अखत्यारीत येत होता. 2012 मधील गुन्हे प्रामुख्याने चेन स्नॅचिंग, घरफोड्या आणि स्थानिक जमिनींचे वाद यापुरते मर्यादित होते. 2020 मध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे स्वतंत्र मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालय स्थापन केल. 2025 च्या आकडेवारीनुसार, पारंपारिक चोऱ्या कमी झाल्या असल्या तरी संघटित आणि हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण गंभीर बनले आहे.

2012 मध्ये संपूर्ण वर्षात मिरा-भाईंदर क्षेत्रात 6 ते 8 हत्येच्या घटनांची नोंद असायची. 2025 च्या आकडेवारीनुसार, संपूर्ण आयुक्तालयातील 57 हत्यांपैकी 12 हत्या एकट्या मिरा-भाईंदर भागात झाल्या आहेत, ज्यातील बहुतांश अत्यंत क्रूर स्वरूपाच्या (उदा. लिव्ह-इन पार्टनरची हत्या, कौटुंबिक क्रूरता) होत्या. 2012 मध्ये वर्षाला अंदाजे 40 ते 50 अपहरणाचे गुन्हे नोंदवले जात (ज्यात बहुतांश अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटना असत). 2025 मध्ये संपूर्ण आयुक्तालयात हा आकडा 759 वर पोहोचला आहे.2012 च्या तुलनेत 2025 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंदणी 300% पेक्षा जास्त वाढली आहे. 2025 मध्ये संपूर्ण क्षेत्रात 466 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. (या वाढीचे एक कारण पोक्सो – POCSO कायदा आणि पोलिसांकडे गुन्हे नोंदवण्याचे वाढलेले प्रमाण हेही आहे).

2012 मध्ये जे गुन्हे नगण्य होते, ते 2025 मध्ये सुरक्षेचा सर्वात मोठा प्रश्न बनले आहेत.2012 मध्ये स्थानिक पातळीवर गांजा पकडण्याच्या किरकोळ कारवाया होत. 2025 मध्ये मिरा-भाईंदर आणि काशिमिरा परिसरात थेट एमडी (MD Drugs) चे कारखाने आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलर्सचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले आहे.2012 मध्ये इंटरनेट बँकिंग फसवणुकीचे गुन्हे दुर्मिळ होते. 2025 मध्ये मिरा-भाईंदरमध्ये दरमहा शेकडो सायबर फसवणूक, टास्क फ्रॉड आणि नायजेरियन स्कॅमर्सचे कॉलिंग सेंटर्स पकडले जात आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख