
परिक्षा आता आणखी कडक होणार
राष्ट्रीय परिक्षा परिषद अर्थात एनटीएने ६०० तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षा-विषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे.
परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी NTA द्वारे चार-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच, NTA पुढील दोन ते तीन आठवड्यांत किमान २५ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त, NTA ची कार्यालये नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रिय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल.
आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार NTA ने घेतला आहे. NTA ची कार्यालये युद्धपातळीवर नवीन जागेत हलवली जातील आणि तिथे CISF च्या तुकड्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल.