
पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) या विद्यार्थी संवाद कार्यक्रमापूर्वी ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) आणि NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) या दोन प्रमुख विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्या असून त्यांच्यात शुक्रवारी रात्री जोरदार संघर्ष झाला.
‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमाच्या आडून केवळ राजकीय अजेंडा चालवला जात असल्याचा आरोप ABVP ने केला आहे.
शिवाजीनगरमधील सीओईपी (COEP) टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात एबीव्हीपीच्या (ABVP) एका विद्यार्थ्यावर कथितरीत्या हल्ला केल्याप्रकरणी, पुणे पोलिसांनी सहा व्यक्ती आणि एनएसयूआय (NSUI) व युवक काँग्रेसचे एकंदर ५०-६० कथित कार्यकर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका विद्यार्थीनीने आपल्यावर महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडून दबाव आणल्याचा आरोप करतानाचा व्हिडीओ व्हारल झाला. हा क्लिप आपण दबावातून केली असल्याचा खुलासा या विद्यार्थीनीने काही वेळातच केला. परंतू यातून राजकीय वातावरण तापले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. AISSMS मैदानावर कार्यक्रम होतो आहे.
पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) या विद्यार्थी संवाद कार्यक्रमापूर्वी ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) आणि NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) या दोन प्रमुख विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्या असून त्यांच्यात शुक्रवारी रात्री जोरदार संघर्ष झाला. ही कथित घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० ते ११ या वेळेत COEP वसतिगृहात घडली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘छात्रों की गूंज’ ही मोहीम देशातील पेपर लीक, परीक्षांचे वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू करण्यात आली आहे. विरोधी संघटना यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप NSUI ने केला.